loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले ते दापोली मार्गावर कारचा भीषण अपघात सहा प्रवासी गंभीर जखमी

पोली तालुक्यातील आंजर्ले ते दापोली मार्गावर सालदुरे एसटी स्टॉप जवळ एका चार चाकी गाडीचा आज ३० नोव्हेंबर रोजी झाडावर आढळून भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील सोंडेघर येथील चिपळूणकर कुटुंबीय आपल्या कुटुंबासह येत असताना गाडीचा ताबा सुटल्याने झाडाला जाऊन धडक दिल्याचे सूत्राकडून समजले आहे .ही घटना रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजले आहे .गाडीमध्ये अमरीन चिपळूणकर ,कादिर चिपळूणकर ,मरियम चिपळूणकर, जारीना चिपळूणकर ,सुमय्या चिपळूणकर आणि फौजिया चिपळूणकर हे एकाच कुटुंबातील सहा प्रवासी प्रवास करीत होते. प्राथमिक उपचाराकरिता दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे सर्व जखमी प्रवाशांना आणण्यात आले होते. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरता मिरज येथे हलवण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg