loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजाची जनता खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, महायुतीचा विजय निश्‍चित : आम. सामंत

केळंबे(लांजा) (सिराज नेवरेकर) :- लांजा नगरपंचायतीवर महायुतीची निर्विवाद सत्ता येणार येणार आहे. यात कोणतीही शंका नाही. विरोधकांकडून खोटा प्रचार सुरू आहे. आम्ही विकासाचा वचननामा घेऊन चाललो आहोत. लांजा कुवे शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. डीपी प्लॅनमध्ये योग्य तो बदल करण्यात आला आहे जनतेच्या अडचणीचे ठरेल तेथे बदल करण्यात येईल. विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्यामुळे खोटा प्रचार करीत असुन लांजा कुवे शहरातील जनता सुज्ञ असुन महायुतीसोबत आहे नगराध्यक्षाचा उमेदवार हा ४ हजारपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन निवडून येईल, याची खात्री असल्याचे लांजा राजापूरचे आमदार किरण सांमत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना आ. किरण सांमत यांनी सांगितले की, आमचे पक्षाकडून तीन ते चार ठीकाणी बंडखोरी झालेली आहे. त्या बंडखोरांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे आणि अन्य कोणी बंडखोरी केलेली असेल त्याचा या महायुतीवर कोणताही परीणाम होणार नाही. आम्ही जी विकास कामे केली आहेत आणि जी करणार आहोत त्याच्यावर ही निवडणूक जिंकणार आहोत. आम्ही खोट बोलून ही निवडणूक जिंकणार नाही. माझे एक तत्व आहे नेहमी बर बोलत नाही खरं बोलतो. लोकांना ते आवडत नाही. नंतर लोकांना पटतं. विरोधकांनी माझ्यासमोर ‘वन टू का वन’ करावे होऊन जाऊदे, खर्‍या पध्दतीने निवडणूक लढवावी. समोरासमोर समोर येऊन खातरजमा करावे, असे आवाहन किरण सांमत यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजाच्या विकास आराखड्यात (डीपी प्लॅन) मध्ये ज्या सुधारणा पाहीजेत त्या केल्या जातील, हे मी सुरूवातीपासून सांगत आहे. ज्या आवश्यक सुधारणा होत्या त्या केल्या आहेत. जे अनावश्यक रस्ते वगळण्यात आले आहेत. नो डेव्हलपमेंट झोन पुर्णपणे काढुन टाकण्यात आलेला आहे. वैयक्तिक अडचणीही शंभर टक्के दूर झाल्या आहेत. ज्यांनी डीपीप्लॅन बनवला तेव्हा त्रुटी राहील्या होत्या. त्या सर्वांना आवडेल असाच डीपीप्लॅन दिला जाईल तसेच त्यातून एखादी नजर चुकीचे चुक राहीली असेल तीही दुरूस्त करण्याचा शब्दही आमदार किरण सामंत यावेळी पत्रकार परिषदेत दिला. लांजाला महायुतीकडून भरीव निधी मिळाला आहे. बरीचशी विकास कामे पूर्णत्वास गेली असुन बरीचशी चालू आहेत. यांचा जाहीरनामा आम्ही उद्या प्रसिद्ध करणार आहोत. खोट्या गोष्टीवरून विश्वास ठेवू नका कोणालाही मतदान करू नका, काही लोकांची पध्दत आहे खोट बोलायच आणि लोकांच्या मनावर राज्य करायचं. मला खात्री आहे महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील. लांजा कुवे परिसरातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवांराना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार किरण सामंत यानी केले. या पत्रकार परिषदेला व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, रत्नागिरी जिल्हा बॅकेचे संचालक महेश खामकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg