loader
Breaking News
Breaking News
Foto

समन्वयाअभावी रखडलेल्या विकासाचे उत्तम उदाहरण म्हणजे गुहागर नगरपंचायत : ऍड.सुप्रिया वाघधरे

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागरच्या जनसमन्वयाअभावी रखडलेल्या विकासाचे उत्तम उदाहरण म्हणजे गुहागर नगरपंचायतचे कामकाज असल्याची टीका गुहागर नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार ऍड. सुप्रिया वाघधरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. त्यापुढे म्हणाल्या की, जनतेशी समन्वय न ठेवता कोणताही अभ्यास न करता शहराचा विकास आराखडा तयार करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम मागच्या पाच वर्षांत झाले. समाजाच्या नावावर राजकारण करून आघाडी बनवली, सत्ता मिळवली पण अभ्यास नाही. लोकांशी संवाद नाही. ज्या समाजाच्या जीवावर सत्ता मिळवली त्यांच्या भल्यासाठी पाच वर्षात काय कामे झाली? म्हणूनच समाज, जात, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी तरुण अभ्यासू पिढी राजकारणात आली पाहिजे आणि त्याच पिढीची प्रतिनिधी म्हणून मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागरच्या जनतेने मला साथ दिली तर सर्वांना विश्वासात घेऊन शहराचा कायापालट होईल. शहरात पार्किंगची व्यवस्था, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, रस्त्यांची डागडुजी ही प्राथमिक कामे आहेत. त्याचबरोबर वाढत्या लोकवस्तीसाठी पाण्याच्या पुरवठा, पथदीप, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी आकर्षक बांधकाम ज्यामुळे पर्यटक आकर्षित होतात, महिला सक्षमीकरणावर भर देणे, महिला सुरक्षा, महिला, लहान मुले आणी वृद्धांमध्ये कायदेशीर अधिकारांची जागरुकता, सीआरझेडच्या चक्रव्यूहात अडकलेल्या गुहागरला सीआरझेडच्या जाचक अटीपासून मुक्त करणे या कामांची अंमलबजावणी करण्याला मी प्राधान्य देईन. तसेच माझे शहर स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज शहर बनवण्याचे माझे ध्येय आहे. केवळ आश्वासने न देता पारदर्शक कारभार आणि जलद विकास कामे राबविणे. पक्ष व समाजाच्या आधाराशिवाय सर्वसामान्य नागरिक ज्याला शहराविषयी तळमळ आहे अशी सुशिक्षित व्यक्ती देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते हा संदेश घेवून मी निवडणूक लढवत असल्याचे ऍड. सुप्रिया वाघधरे यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg