loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा येथे श्री राम मंदिर ध्वजपताका उत्सव उत्साहात साजरा

म्हसळा-रायगड : अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरावरील धर्म ध्वजपताका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते फडकविण्यात आली.या ऐतिहासिक सोहळ्याच्या पाश्वभूमीवर संपूर्ण देशभर आनंद, उत्साह आणि धार्मिक भावनेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्या अनुषंगाने म्हसळा शहरात उत्साहपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मंगळवार,दिनांक २५/११/२०२५ रोजी शहरातील श्रीराम मंदिर येथे हिंदू ग्रामस्थ मंडळ म्हसळा तर्फे ध्वज पताका उत्सव पार पडला.नगरसेवक निकेश कोकचा यांच्या हस्ते सपत्नीक श्री रामाच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक करण्यात आला.धर्मध्वज पूजन करण्यात आले.त्याचबरोबर अयोध्येत“धर्म ध्वज” फडकविण्याचे वेळी श्रीराम मंदिरावर मंगलतेने धर्म ध्वज फडकविण्यात आला.कार्यक्रमाची सांगता महाआरतीने करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोहळ्याच्या वेळी हिंदू ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुशील यादव, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, शैलेश पटेल, गौरव पोतदार, संतोष उद्धरकर, दीपल शिर्के, निलेश करडे, विकास धारिया, अनिल बसवत, राजेंद्र बोरकर, निलेश मांदाडकर, तुकाराम पाटील, ललित चीपा, चेतन जैन, रमेश घोसाळकर, संपदा पोतदार, तन्वी करडे, धनश्री फाटक,सुहासिनी आंगोलकर यांच्यासह अनेक हिंदू ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसन्न निजामपूरकर, संदीप गव्हाणे, कुस्तुभ करडे, संजय पाटुकले, सुधीर करडे, गौरी प्रसाद पोतदार, हर्षला करडे,नंदकुमार जंगम यांनी मनःपूर्वक परिश्रम घेतले. धर्मभावना, भक्ती आणि एकात्मतेचे दर्शन घडविणारा हा उत्सव म्हसळा शहरात भक्तिमय वातावरणात अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg