loader
Breaking News
Breaking News
Foto

सोवेली येथे शिवीगाळ व मारहाणीची घटना, सहा जणांचे विरोधात गुन्हा दाखल

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील सोवेली येथे एकास शिवीगाळ करत त्याचेवर सामुहीक जीवघेणा हल्ला करीत मारहाण केल्याची घटना 15 मार्च 2025 रोजी घडली असून या संदर्भात मंडणगड पोलीस स्थानकात 13 नोव्हेंबर 2025 रोजी गावात गुंडगिरी करणाऱ्या सहा जणांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने संदर्भात अशोक अनंत दळवी वय (70) राहणार सोवेली यांनी पोलीलांकडे दिलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार दिनांक 15 मार्च 2025 रोजी रात्री 11.00 वाजता फिर्यादी यांचे कुटुंब व ग्रामस्थ रात्रीचे वेळी ग्रामस्थ सुशील दळवी यांच्या आंगणात बसले होते त्यावेळी त्या ठिकाणी संशयीत आरोपी विश्वनाथ पांडुरंग दळवी मद्यधुंद अवस्थेत सोबत एकनाथ पांडुरंग दळवी, रविंद्र पांडुरंग दळवी, प्रताप सुरेश दळवी, नंदकुमार सुभाष दळवी, अमेय विश्वनाथ दळवी सर्व राहणार सोवेली यांना घेऊन आले व फिर्यादी यांना विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादी यांचे जीवघेणा हल्ला करुन मारहाण केली. तसेच शिवीगाळ करताना अंत्यत अवमानकारक शब्द वापरून खुर्ची सकट मागे ढकलून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये फिर्यादी यांच्या हातास मुका मार लागला नमुद सहा जणांचे विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात 13 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय न्यायसंहिता अधिनीयम 2023 चे कलम 189(2)324(4)351(2) 352 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंडणगड पोलीस स्थानकाचेवतीने या संदर्भात अधिक तपास सुरु आहे. या विषया संदर्भात फिर्यादींकडून मिळालेल्या माहीतीनुसार पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गावात गावगुंडगिरी करणाऱ्यांचे विरोधात पोलीस स्थानकात एफ.आर. आय नोंद करण्यात आला असून संबंधितांना पोलीस स्थानकाकडून 25 नोव्हेंबर 2025 रोजी चौकशीसाठी पाचरण करण्यात आले आहे. पोलीसांनी केवळ चौकशी न करता संबंधितांविरोधात शक्य ती रितसर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg