loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहराच्या विकासासाठी जनतेने आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे : प्रियांका यादव

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा वासियांसाठी नवनवीन संकल्पना अमलात आणणार असुन, गेल्या अनेक वर्षांपासून लांजाच्या नळपाणी योजनेचा प्रश्न सुटलेला नाही. लोकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा अध्यापही होत नाही. यासाठीच आपण नवा फिल्टरेशन प्लांट कार्यरत करणार आहोत. त्यामुळे सर्व प्रभागात वेळेवर नियमित शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे.यासाठी जनतेने आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन लांजा नगराध्यक्ष पदाच्या लांजा कुवे संघटनच्या अपक्ष उमेदवार सौ. प्रियांका संजय यादव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या या जाहीरनाम्याद्वारे प्रियांका संजय यादव यांनी शहरातील नागरिकांसाठी नवनवीन संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रशासनामध्ये मराठी टक्का वाढावा म्हणून भविष्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मनाच्या मशागतीसाठी डिजिटल वाचनालयाची सुविधा देखील सुरू करणार आहोत. लांजा शहरातील जे नागरिक विविध प्रकारची उत्पादने आणि पिके घेतात अशा नागरिकांसाठी, त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी ' लांजा बाजार' ही आधुनिक व अभिनव संकल्पना आपण राबवणार आहोत.त्याचप्रमाणे शहरातील छोटे छोटे व्यापारी फेरीवाले यांचे देखील योग्य ते व्यवस्थापन करणार .असल्याचे सांगितले. लांजा बाजारपेठेत असणारी स्वच्छतागृहांची आवश्यकता आणि त्यामुळे होणारे गैरसोय लक्षात घेता बाजारपेठेत महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह . महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता शालेय विद्यार्थिनी आणि तरुणींसाठी नियमित स्वसंरक्षणा संदर्भातील प्रशिक्षण देखील दिले जाईल . तसेच महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने देखील कार्यवाही करणार आहोत. याबरोबर लांजावासीयांना सध्या भेडसावणारे प्रश्न यामध्ये चुकीच्या प्रारुप विकास आराखड्याला स्थगिती देणे, नवा लोकाभिमुख विकास आराखडा तयार करणे, शहरातील रस्त्यांचे दर्जेदार आणि नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण करणे. शहरातील पादचारी मार्ग आणि शहरात पार्किंगची व्यवस्था करणे.यासाठी प्रामुख्याने केले जाणार असल्याचे सांगितले.

टाइम्स स्पेशल

शहरातील नागरिकांना भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गंभीर समस्या बनली आहे.रस्त्यावर भटक्या गुरांचे व्यवस्थापन करण्याबरोबरच भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करणार आहोत. जेणेकरून हा प्रश्न पुढे कायमचा निकाली काढण्याचा प्रयत्न राहील तसेच डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न कायमचा निकाली काढणार असून घनकचरा प्रकल्पातून खत निर्मिती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यादव म्हणाल्या. शहरात असणारे काळोखाचे साम्राज्य, बंद पडणारे पथदीप यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता स्वच्छ प्रकाशमान पथदीप जागोजागी उभारले जाणार असून प्रत्येक प्रभागात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रणाली यंत्रणा आपण बसवणार आहोत. संपूर्ण लांजा आणि कुवेगाव यामुळे प्रकाशमान होणार आहे. मैदानी खेळासाठी भव्य क्रीडांगणे उभारणार असून इनडोअर खेळासाठी देखील क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. कामानिमित्त नगरपंचायतीत येणाऱ्या नागरिकांच्या कामांना यापुढे प्राधान्य देणार आहे. तसेच प्रशासनात पारदर्शकता व सरकारी योजना माहिती कक्षा देखील उभारणार आहोत. प्रत्येक महिन्याला त्या त्या प्रभागात आढावा बैठक घेऊन विकास काम संदर्भात लोकांशी चर्चा केली जाणार आहे . जनसंवादातून विकास कामांवर भर दिला जाणार आहे. याचबरोबर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी उद्याने निर्माण करणार असून लांजातील कलाप्रेमींसाठी अध्यायावत आणि सुसज्ज असे नाट्यगृह देखील उभारणार असल्याची ग्वाही प्रियांका संजय यादव यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg