loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ९७ लाखांची फसवणूक

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरात सायबर फसवणुकीचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून अज्ञात आरोपीने तब्बल ९७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणार्‍याने स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी भासवून ही मोठी रक्कम खात्यावर आरटीजीएसद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतली आहे. १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही घटना घडली. आरोपीने ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधून, तुमच्या बँक खात्यातून २५ लाख रुपयांचा व्यवहार झाला असून तो ’मनी लॉन्ड्रींग’चा प्रकार आहे. या प्रकरणी तुम्हाला चौकशीसाठी स्वतः मुंबईला यावे लागेल, असे सांगितले. प्रत्यक्ष येणे शक्य नसल्यास त्यांनी ऑनलाईन चौकशीला सामोरे जावे, असे सांगून भीती निर्माण केली. या दबावाखाली येऊन फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या विविध गुंतवणुकीची रक्कम गमावली. आरोपीने त्यांच्या फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवलेली एकूण ९७ लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे स्वतःच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतली आणि त्यांची फसवणूक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे सायबर पोलिसांच्या मदतीने सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे, गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये सायबर पोलीस ठाणे, सिंधुदुर्ग यांच्या मदतीने पोलिसांनी वेगाने कार्यवाही करत सुमारे ३ ते ४ तासांत ९ लाख रुपये होल्ड करण्यात यश मिळवले आहे. पुढील समांतर तपास सायबर पोलीस ठाणे, सिंधुदुर्ग हे करत आहेत.

टाइम्स स्पेशल

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. अशा प्रकारचे कोणतेही कॉल किंवा मेसेज आल्यास घाबरून जाऊन चुकीचा प्रतिसाद देऊ नये. आपल्या जवळच्या व्यक्तीला याबाबत तात्काळ माहिती द्यावी. तसेच, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर माहिती रजिस्टर करावी आणि जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

‘मुंबई क्राईम ब्रँच’च्या नावाने सायबर गंडा!

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg