loader
Breaking News
Breaking News
Foto

वन्य हत्ती ‘ओंकार’ प्रकरणात आश्वासने अपूर्ण; गुणेश गवस आजपासून ठिय्या आंदोलनाला सज्ज

बांदा (प्रतिनिधी) - वन्य हत्ती ‘ओंकार’वरील अत्याचार प्रकरणात वनखात्याने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. २७ नोव्हेंबरपासून बांदा येथील श्रीराम चौकात ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी लेखी निवेदनाद्वारे जाहीर केले असून, समाधानकारक तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणासह जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओंकार हत्तीला लाकडी दांड्याने मारहाण आणि सुतळी बॉम्ब फेकून त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई, दोषींना निलंबित करणे आणि ओंकारला नैसर्गिक अधिवासात हलविणे या मागण्यांसाठी १० नोव्हेंबर रोजी गवस यांनी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी काही आश्वासने देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.

टाईम्स स्पेशल

मात्र या आश्वासनांवर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे वनखात्याने दिशाभूल केल्याचा आरोप गवस यांनी केला आहे. सुतळी बॉम्बचा वापर थांबवू असे आश्वासन असूनही पुन्हा बॉम्ब फोडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनादरम्यान स्वतःबाबत काहीही अनिष्ट घडल्यास त्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला. या घडामोडींमुळे ‘ओंकार’ प्रकरण परिसरात चांगलेच चर्चेत आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg