loader
Breaking News
Breaking News
Foto

संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने दोडामार्ग येथे ७६ वा संविधान दिन साजरा

साटेली : (प्रतिनिधी) - भारतीय संविधानाला आज ७६ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने संविधान दिन साजरा करत संविधानिक मूल्यांची गरज व वास्तव या विषयावर परिसंवाद दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष महेश परुळेकर यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत जाधव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी बहाल केले. त्याची अंमलबजावी २६ जानेवारीला १९५० रोजी झाली. आज संविधानाला ७६ वर्ष पूर्ण झाली. तो संविधान दिन आज दोडामार्ग येथील स्नेह अपार्टमेंट याठिकाणी संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने साजरा केला यानिमित्त संविधानिक मूल्यांची गरज व वास्तव या विषयावर परीसंवाद आयोजित करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आल्या उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते फोटोना पुष्प हार अर्पण आणि द्विप प्रज्वलन करीन कार्यक्रम सुरु करण्यात आला. यावेळी संविधानिक हिताकारिणी महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष महेश परुळेकर, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, संघटक अंकुश जाधव, ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, उपाध्यक्ष शंकर जाधव, सहसचिव संदीप जाधव, केशव जाधव, प्रकाश कांबळे, सखाराम कद, हरिश्चंद्र मणेरीकर, नगरसेविका ज्योती जाधव, तुषार जाधव, जागृती सासोलकर, सरिता पिळगावकर, प्रगती कांबळे,सह आदी उपस्थित होते. संविधानिक मूल्यांची गरज व वास्तव या विषयावर आयोजित परिसंवादमध्ये उपस्थित मान्यवर यांनी सहभागी होत आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव, प्रास्ताविक शंकर जाधव तर आभार प्रकाश कांबळे यानी मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg