loader
Breaking News
Breaking News
Foto

जलस्त्रोताच्या बळकटीकरणासाठी गोठे ग्रामपंचायतीचा प्रेरणादायी उपक्रम

संगलट (खेड)(प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रभावी वेध घेत मंडणगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोठे यांचेवतीने कार्य क्षेत्रातील गोठे, गोठे खलाटी, सिद्धार्थ नगर, बोरखत, धामणी व कळकवणे या गावांमध्ये जलस्रोत संवर्धनासाठी भव्य श्रमदान उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांनी कच्चे, वनराई व विजय बंधारे उभारून तसेच नदीतील गाळ काढून जलसाठा वाढवण्याचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये एका दिवसात तब्बल १५ बंधारे, तर आजवर एकूण २० बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थ व महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रशंसनीय उपक्रमाचे कौतुक करत गटविकास अधिकारी सुनीलखरात यांनी जलस्रोत बळकटीकरणासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न अधोरेखित केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुढील कामकाजासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी सुनील खरात, विस्तार अधिकारी पवन गोसावी, समीर वारे, माजी सभापती दौलत पोस्टुरे, सरपंचअंजली घागरूम, उपसरपंच संजय बोतरे, सदस्य उमेश घागरूम, विनोद जाधव, प्रवीना भुवड, रिया बंगाल, ग्रामपंचायत अधिकारी दीपक टेमकर, आशा सेविका सृष्टी जाखल, पोलीस पाटील अजय शिंदे, डेटा ऑपरेटर स्वप्नील आग्रे, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश महाडिक, प्रगती भुवड, स्वरा घागरूम उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

एका दिवसांत तब्बल १५ बंधाऱ्यांचे बांधकाम

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg