loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: महायुती-महाआघाडीमध्ये फूट, १२५ अर्ज दाखल!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ६२ अर्ज दाखल झाले, त्यामुळे आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची एकूण संख्या १२५ झाली आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार आहे त्यामुळे ​महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असून, काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.उबाठा (शिवसेना ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि मनसे यांनी एकत्रित येऊन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. ​या आघाडीने एकूण २१ जागांवर उमेदवारी दाखल केली आहे, ज्यात सीमा मठकर यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. ​काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी साक्षी वंजारी यांच्या रूपाने उमेदवारासह एकूण १६ जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केले. उबाठाने काँग्रेसला चार जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती, परंतु नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर काँग्रेस ठाम राहिल्याने आघाडीत बिघाडी झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महायुतीमधील घटक पक्षही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. ​भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. ​भाजपने शेवटच्या क्षणी काही इच्छुकांचे पत्ते कट करत नव्या आणि अनपेक्षित चेहऱ्यांना रिंगणात उतरवले आहे. ​प्रभाग ९ मधून रुजूल पाटणकर (स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक) आणि नीलम परिमल नाईक (अँड परिमल नाईक यांची पत्नी) यांना संधी देण्यात आली आहे. ​उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने बंडखोरीची संभावना निर्माण झाली आहे. ​प्रभाग ६ मधून अर्चित पोकळे (आमदार केसरकर यांचे समर्थक) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली, ज्यामुळे शिंदे शिवसेनेचे उमेदवार देव्या सूर्याजी यांना अडचण निर्माण होऊ शकते. प्रभाग ५ मध्ये बबलू मिशाळ (आमदार केसरकर यांचे समर्थक) यांनी बंडखोरी केली असून, शिंदे शिवसेनेचे उमेदवार बंड्या कोरगावकर यांच्या समोर रिंगणात उतरले आहेत.​या दोन्ही बंडखोरांची नाराजी दूर करत उमेदवारी मागे घेण्यासाठी आमदार केसरकर यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

टाईम्स स्पेशल

प्रभाग ३ मधून राधिका चितारी यांनी अपक्ष उमेदवारी भरल्याने, भाजपच्या उमेदवार मोहिनी मडगावकर यांना अडचणीचे ठरणार आहे. ​नवीन चेहऱ्यांना संधी: भाजप, शिंदे शिवसेना आणि उबाठा (ठाकरे गट) कडून यावेळी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ​राष्ट्रवादी (अजित पवार गट) यावेळी स्वतंत्रपणे रिंगणात उतरला आहे. ​या गटाने नगराध्यक्ष पदासाठी उल्का उमाकांत वारंग यांचे नाव जाहीर केले होते. ​मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उल्का वारंग यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने आणि त्या ३ वाजेपर्यंत हजर न राहिल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ झाली. अखेरीस, अजित पवार गटाने केवळ पाच नगरसेवक पदाच्या जागेवर उमेदवारी दाखल करण्यावर समाधान मानले. तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी सांगितले की, उल्का वारंग व अन्य नगरसेवक पदाचे उमेदवार अर्ध्यावरून परतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg