loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा ते सांगवड एसटीचा मार्ग बदलल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

म्हसळा (वार्ताहर) - दररोज दुपारी एक वाजता सुटणारी म्हसळा ते सांगवड एस टी मार्ग नेवरूळ कोकबल ठाकरोळी सांगवड अशा प्रकारे होता परंतु कोणालाही ग्रामस्थ किंवा कोणत्याही प्रवाशाला विश्वासात न घेता काही दिवसापूर्वी गाडी घूम रुद्रवट व्हाया करण्यात आली आणि त्याचा भुर्रदंड कोकबळ सांगवड ठाकरोली या गावाला बसला आहे. त्या संदर्भात आज ठाकरोली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी श्रीवर्धन आगार येथे आगार व्यवस्थापक मणेयार यांची भेट घेतली. त्यावेळी प्रवाशांनी आपल्या समस्या आगार व्यवस्थापका समोर मांडल्या. व्यवस्थापक मणेयार यांनी त्यांचा सूचना ऐकून घेतल्या आणी त्यांना आश्वासन दिले की येत्या 2-3 दिवसात नियमित सुटणारी दुपारी 1 वाजता म्हसळा ते सांगवड गाडी पूर्व वेळेत आणि पूर्व मार्गाने चालू करण्याचा प्रयत्न करणार.त्यावेळी ठाकरोळी ग्रामपंचायत सरपंच माननीय सौ श्वेता जाधव, सदस्य हर्षद जाधव,ठाकरोळी ग्रामीण अध्यक्ष विनायकजी खेरटकर, मोहनजी कापडी, भीवा खोपरे, चंद्रकांत डांगे, काशिनाथ गोरीवले, उषा शिंदे, वैभव मोरे ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg