loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी मोती तलाव वाचवण्यासाठी आणि पाणी, घरपट्टी ५० टक्के माफ करण्यासाठी काँग्रेस स्वबळावर मैदानात – ॲड. दिलीप नार्वेकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करत शहराच्या सर्वांगीण विकासाचा 'मास्टर प्लॅन' नसल्याबद्दल विरोधकांवर टीका केली आहे. नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. नार्वेकर यांनी, सावंतवाडी मोती तलाव हा शहरवासीयांचा श्वास आहे, मात्र या तलावाच्या मालकीवरून सध्या न्यायालयात दावा सुरू आहे. भविष्यात हा तलाव नगरपरिषदेच्या हातून गेल्यास सावंतवाडीचा श्वास जाईल, अशी भीती व्यक्त केली. ​काँग्रेसच्या हाती सत्ता आल्यास पाणीपट्टी आणि घरपट्टी ५० टक्के माफ करण्याचा आमचा विचार आहे. ​सत्ता आल्यास शहरवासीयांना चांगल्या सुविधा देऊ असे त्यांनी सांगितले. ​शहराचे योग्य नियोजन करण्याबरोबरच विविध गोष्टी नव्याने अंमलात आणणार आहोत. ​ॲड. नार्वेकर म्हणाले की, तब्बल तीस वर्षे नॉन-स्टॉप काँग्रेसची सत्ता असताना मी शहराच्या सर्वांगीण विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला होता, पण आता विरोधक कोणताही मास्टर प्लॅन करण्याअगोदर केवळ गप्पा मारत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडीत मी तीन टर्म नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे.​या निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी, अशी आमची अपेक्षा होती आणि त्यासाठी प्रयत्नही केले, पण आघाडी झाली नाही.​ आमची ताकद काय आहे हे दाखवून देण्यासाठी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह १७ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. ​सध्या सर्वच पक्ष विकासाच्या गप्पा मारत आहेत, पण विकासाचा ठोस प्लॅन कोणाकडेच नाही. प्लॅन असल्याशिवाय शहराचा विकास साध्य नाही.​ शहरात पार्किंगसह इतर गैरसोयींवर लक्ष केंद्रित करून योग्य नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. ॲड. नार्वेकर यांनी मोती तलावाच्या न्यायालयीन दाव्यामुळे विकासात अडथळा येत असल्याचे सांगितले. तसेच, 'मल्टिस्पेशालिटी'चे भूमिपूजन झाले असले तरी जागेच्या प्रश्नात ते अडकले आहे. आयुर्वेद कॉलेजची जागा सुचवूनही त्याकडे लक्ष दिले गेले नाही, असे त्यांनी नमूद केले. मोती तलाव आपला श्वास आहे; "तो गेला तर आम्ही गुदमरून मरू", असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

टाईम्स स्पेशल

उमेदवारांना सत्तेसाठी मते विकत घेण्याची वेळ आली आहे, असा आरोप करत ॲड. नार्वेकर यांनी जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, एका मतासाठी १० ते २० हजार देण्याची तयारी आहे. हा माणसाचा रेट लावला जात आहे. हे विष आहे, ते तुम्ही स्वीकारू नका. ​नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साक्षी वंजारी म्हणाल्या, 'माझ्यासह नगरसेवक पदासाठीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. जनतेमधून आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्वबळाच्या निर्णयाचे लोकांनी स्वागत केले आहे. 'डोअर टू डोअर' प्रचार केला असून निश्चितच काँग्रेसला यश मिळेल.' ​यावेळी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, रवींद्र म्हापसेकर, संजय लाड यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साक्षी वंजारी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यशवंत पेडणेकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, अरुण भिसे, सौ सुमेधा सावंत, बाळ नमशी, ॲड. रितू परब, संतोष जोईल आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg