loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख प्रभाग ८ मधून ॲड. लक्ष्मीकांत जाधव यांची अधिकृत उमेदवारी

देवळे (प्रकाश चाळके) - दवरुख नगरपंचायत प्रभाग क्रमांक ८ साठी ॲड. लक्ष्मीकांत वसंत जाधव यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक रिंगणात उभे असून, बुद्धिजीवी वर्गासह स्थानिक नागरिकांचा त्यांना मजबूत पाठिंबा लाभत आहे. न्यायालयीन विभागात तब्बल २३ वर्षे कार्यरत राहून त्यांनी जिल्हास्तरीय कर्मचारी संघटनांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर काम करत अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. शेट्टी कमिशन मिळवून देण्यात त्यांचे योगदान मान्यताप्राप्त आहे. सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी एलएलबी आणि पीजी(ADR) शिक्षणाच्या आधारावर वकिली कारकिर्द सुरू केली. न्यायालयीन प्रणालीचे सखोल ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यामुळे त्यांची ओळख तडफदार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढणारे वकील म्हणून होत गेली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९९८ मध्ये देवरुख ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या जाधव यांनी सहा महिन्यांत साडेतीन लाखांची विकासकामे पूर्ण केली होती. सध्याचा गणेश विसर्जन घाट त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय कामांपैकी एक आहे. क्रीडा क्षेत्रातही जाधव यांचे महत्त्वाचे योगदान आहे. बालमित्र मंडळाच्या माध्यमातून कबड्डी, क्रिकेट व कॅरम स्पर्धांचे आयोजन त्यांनी अनेक वर्षे केले. जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून काम केले आहे. सध्या ते देवरुख वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष असून, क्रीडा आणि न्याय या दोन्ही क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग कायम ठेवत आहेत.

टाइम्स स्पेशल

प्रभागासाठी त्यांच्या प्रमुख योजना: विस्कळीत पाणीपुरवठ्याचे सुधारणा काम, गणेश विसर्जन घाटाचे विस्तारीकरण, देवरुखमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठ्यासाठी पाठपुरावा, नवीन बांधकामांच्या गुणवत्तेवर कठोर लक्ष, नगराध्यक्ष कबड्डी चषकासाठी बजेट तरतूद उच्च शिक्षण, अनुभवी प्रशासकीय दृष्टी आणि विकासाभिमुख कार्यपद्धती यांच्या जोरावर प्रभाग ८ च्या सर्वांगीण विकासासाठी ॲड. लक्ष्मीकांत जाधव हे सक्षम उमेदवार मानले जात आहेत. आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे मतदारांचे लक्ष वेधले गेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg