loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल-करंजाडे पुलासह रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळेच पनवेल परिसराचा विकास वेगाने होत असून विकासाची गंगा करंजाडे येथे आल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल आणि करंजाडे दरम्यान गाढी नदीवर बांधण्यात येणार्‍या 50 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नवीन पुलाचे तसेच सिडकोच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या निधीतून करंजाडे सेक्टर 1 ते 6 मधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या महत्त्वाच्या कामांच्या शुभारंभामुळे वाहतुकीमध्ये सुलभता येणार असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करंजाडेच्या विकासाच्या दृष्टीने नवा अध्याय लिहिला जात असल्याचे सांगून करंजाडे आणि उलवे नोड पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. मंत्रालयीन स्तरावर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होत आली असून लवकरच करंजाडे नोड पनवेल महापालिकेला जोडला जाईल. सध्या पुलाच्या माध्यमातून जोडणी सुरू होत असून हा महत्त्वाचा पूल लवकर पूर्ण व्हावा यासाठी आपण सर्वजण पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.

टाईम्स स्पेशल

आपल्या भाषणात आमदार महेश बालदी यांनी, लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे करंजाडे परिसराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे नमूद केले. परिसरात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून हा पूल पुढील 18 महिन्यांमध्ये करंजाडेवासीयांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून जनतेची सेवा करण्यासाठी भाजप तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg