loader
Breaking News
Breaking News
Foto

महिलेचा खुन प्रकरणी आरोपीला चोवीस तासात अटक

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालयात देसाई गावचे खाडी पुलाचे खालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेचे प्रेताचे गुढ उकलले, महिलेचा खुन करून तिचा मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून देसाई खाडीमध्ये फेकणार्‍या आरोपीस २४ तासाचे आत अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या दरम्यान नियंत्रण कक्ष, ठाणे येथुन प्राप्त झालेल्या संदेशानुसार देसाई गाव कडुन कल्याणकडे जाणारे रोडवर देसाई गावचे पुढील खाडी ब्रिजचे खाली एका बॅगेमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याबाबत माहिती मिळून आली होती. त्याप्रमाणे बिट मार्शल २ वरील अंमलदार यांनी खात्री करुन पोलीस ठाण्यात माहिती कळविली, त्याप्रमाणे लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांचेसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी भेट देवून पाहणी केली असता तेथे खाडीचे पाण्यातील मातीचे भरावावर एक बॅग पडलेली दिसुन आली. त्यामध्ये एका २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचे प्रेत पाय गुडघ्यात दमडुन ट्रॉली बॅगमध्ये भरलेले व अर्धवट बाहेर आल्याचे दिसत होते. मयत महिलेचे अंगात नेसुस गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर नक्षीदार फुलांची डिझाईन, त्याखाली लाल रंगाची लेगीन्स घातलेली होती. तिचे डावे हाताचे मनगटाजवळ पी.व्ही.एस असे इंग्रजीमध्ये गोंदलेले होते. तसेब प्रेत फुगलेले व अर्धवट कुजलेले होते. सदर मयत महिलेचे नातेवाईक किंवा परिचीत मिळुन आलेले नाहीत. त्यावरुन २४ नोव्हेंबर/२०२५ रोजी दुपारी सव्वा एक पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अनोळखी महिलेस अज्ञात कारणावरून कश्याने तरी जिवे ठार मारून प्रेत ट्रॉली बॅगमध्ये भरुन सदर ठिकाणी प्रेत ट्रॉलीबॅगसह पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने देसाई खाडी ब्रिजखाली फेकुन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिळ डायघर पोलीस ठाण्यात कलम १०३(१),२३८ प्रमाणे अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी मयताची ओळख पटवून आरोपीचा शोध तपासकामी अधिनस्त अधिकारी / अंमलदार यांचे चार तपास पथके तयार करून गुन्हयाचा तपास चालू असताना सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर प्रसारीत केलेल्या बातमीद्वारे एका साक्षीदाराकडून अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांना प्राप्त उपयुक्त माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीताबाबत सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या माध्यमातुन कसोशीने शोध घेवुन सदर गुन्हयात आरोपीत नामे विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (५०) रा. ठि. देसाईगाव, ता. जि. ठाणे मुळगाव-गोरखपुर, उत्तरप्रदेश यास देसाई येथून ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयातील मयत महिला नामे प्रिर्याका विश्वकर्मा वय २२ वर्षे ही आरोपीसोबत मागील ०५ वर्षापासुन राहावयास होती. त्याच्यात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रौ आपसात भांडण झाले होते. आरोपीत याने मयत महिलेचा गळा दाबुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने तिला ट्रॉली बॅगमध्ये भरुन ०१ दिवस रुममध्येच ठेवले होते. मयत महिलेच्या प्रेताची दुर्गंधी सुटल्यानंतर दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रौ ११.३० ते १२.०० वा. चे दरम्यान प्रेत असलेली ट्रॉलीबॅग रोडने पायी चालत खाडी पुलाकडे घेवुन जावुन सदरची ट्रॉलीबॅग पुलावरून खाली फेकुन दिली होती.

टाइम्स स्पेशल

मयत व आरोपीताबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना सोशल मिडीयामध्ये प्रसारीत झालेल्या बातमीच्या आधारे साक्षीदार मिळवून, हददीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करुन सदर गुन्हयातील मयताची ओळख पटवून आरोपीस सदर गुन्हयात २४ तासात अटक करुन खुनावा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून स्तुत्य अशी कामगिरी केलेली आहे. सदरची कामगिरी सुभाषचंद्र बुरसे पोलीस उप आयुक्त परि. १ ठाणे, प्रशांत कदम पोलीस उप आयुक्त परि. ५ वागळे इस्टेट, प्रिया डमाळे सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, श्रीराम पौळ वपोनि शिळ-डायघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र राऊत, सपोनि / संतोष चव्हाण, सपोनि/अनिल राजपुत, सपोनि/योगश लामखडे, सपोनि/शहाजी शेळके, सपोनि/अमोल पोवार, पोउपनिरी/माने, पोउपनिरी/बेळगे, पोउपनिरी/लिडके, पोह/श्यामकुमार राठोड, पोह हनुमंत मोरे, पोह/भरत जाधव, पोह/तेजस परब, पोह / विश्वास मोटे, पोह/महेंद्र लिंगाळे, पोह/सचिन कोळी, पोह/ अजय साबळे, पोह/रमेश पाटील, पोह/विकांत कांबळे, पोना मंदार यादव, पोना/ महेंद्र पाटील, पोशि/संदीप बोरकर, पोशि/सुशिल पवार, पोशि/ललीत महाजन, पोशि/जयेश येळवे, पोशि रत्नदिप चौधरी, पोशि/अक्षय पाडळे, पोशि/स्वप्निल सोनवलकर, पोशि/वाहीद तडवी, पोशि/ विजय खाडे यांनी केलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg