loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणा नियामक मंडळाच्या सदस्य पदी डॉ.संदीप कांबळे

रत्नागिरी - खानू येथील रहिवासी आणि महाराष्ट्र शासनाच्या सेंद्रिय शेती धोरण व विपणन या कमिटीचे सदस्य राहिलेले डॉ. संदीप बबन कांबळे यांची महाराष्ट्र राज्य सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणा नियामक मंडळाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. राज्यातून दोन शेतकरी सेंद्रिय शेतीतील अनुभवी तज्ञ म्हणून निवड झाली असून सेंद्रिय शेती क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्याला राज्याच्या सर्वोच्च धोरणात्मक मंडळावर स्थान मिळाल्याने जिल्हाभर आनंद व्यक्त होत असून डॉ.संदीप कांबळे यांना सर्वच स्तरावरून तसेच कृषी विभागाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नियामक मंडळाच्या तरतुदीनुसार डॉ.कांबळे यांचा पदावधी दोन वर्षांचा असेल या कालावधीत ते राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांना देखील प्रमाणीकरण प्रक्रियेत येण्यासाठी प्रतिनिधी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतील. नियुक्तीनंतर मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता अपर मुख्य सचिव (कृषी) मान. विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. डॉ. संदीप कांबळे यांचा गेली 18 वर्षे सेंद्रिय शेतीचा अनुभव तसेच मागील 12 वर्षांचा देशांतर्गत पी.जी.एस. प्रामाणिकरण प्रणाली व देश व परदेशातील तृतीय पक्ष प्रमाणीकरणाचा अनुभव पाहता त्यांची निवड शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याची ठरणार आहे. याचा प्रत्यय पहिल्याच मीटिंगमध्ये आला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून प्रथमच आपले राज्य स्वतःची सेंद्रिय व प्रमाणीकरण यंत्रणा अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे त्याचा फायदा राज्यातील शेतकरी कंपन्या व शेतकरी गटांना जास्तीत जास्त झाला पाहिजे म्हणून प्रमाणीकरण फी सर्वसाधारण शेतकऱ्यांना देखील परवडली पाहिजे अशी मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच दुसरी मीटिंग होईल व त्या मीटिंगमध्ये प्रमाणीकरण प्रक्रिया व फी बाबत योग्य तो निर्णय होऊन अमलात आणला जाईल. देश व विदेशात सेंद्रिय मालाला असलेली प्रचंड मागणी पाहता जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक प्रमाणिकरण प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या मालाला निश्चित भाव मिळवावा व निसर्गाचे संतुलन राखावे असे आवाहन डॉ.संदीप कांबळे यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg