loader
Breaking News
Breaking News
Foto

आयुष रायकरला कै. लीला रामचंद्र फडके बुद्धिबळ स्कॉलरशिप

रत्नागिरी : जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारी २०२५ सालची स्कॉलरशिप रत्नागिरीतील १२ वर्षीय बाल बुद्धिबळपटू आयुष रायकर याला प्रदान करण्यात आली. मूळचे चिपळूण येथील व सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेले चार्टर्ड अकाउंटंट आदित्य फडके यांनी त्यांच्या आजीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही बुद्धिबळ स्कॉलरशिप सुरू केली आहे. २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या स्कॉलरशिपचे स्वरूप आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुद्धिबळ स्पर्धांत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवान बुद्धिबळपटूला प्रतिवर्षी ही स्कॉलरशिप देण्यात येते. आयुष रायकर याने या वर्षी बुद्धिबळात सातत्याने चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे. नुकत्याच साताऱ्यात पार पडलेल्या विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयुषने १४ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्वतः बिगरमानांकित असलेल्या आयुषने स्पर्धेत एकूण पाच फिडे मानांकित खेळाडूंचा पराभव करीत राज्यस्तरावर धडक मारली होती. शताब्दी महोत्सवी गणेशोत्सवाचे औचित्य साधून टिळक आळी गणेशोत्सव मंडळा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत देखील आयुषने अनेक फिडे मानांकित खेळाडूंना पराभूत केले होते. तत्पूर्वी या वर्षीच्या १३ वर्षांखालील कै. अनिल कानविंदे स्मृती जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत आयुषने विजेतेपद प्राप्त केले होते. तसेच कै. वासुदेव सावंत स्मृती क्लासिकल स्पर्धा , राजापूर येथील महाशिवरात्री चषक अश्या स्पर्धांत त्याने चांगली कामगिरी करीत खुल्या गटात पारितोषिके प्राप्त केली आहेत.

टाइम्स स्पेशल

रत्नागिरी जिल्ह्यात बुद्धिबळाचा अधिक प्रसार व्हावा या हेतूने जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतगत असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे संपन्न झालेल्या या स्कॉलरशिप प्रदान प्रसंगी श्रद्धा फडके , विजय भिडे, गजानन भिडे , गौरी भिडे , मंगेश मोडक , बुद्धिबळपटू वरद पेठे , प्रशिक्षक चैतन्य भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg