loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

खेड (दिलीप देवळेकर) - नुकताच नवभारत हायस्कूल, भरणे येथील र.बा. जाधव विद्यार्थी वसतिगृहात लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने भविष्यातील खेड या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यातील खेड कसे असेल, म्हणजे फक्त कॉंक्रीटची इमारती, रुंद रस्ते किंवा मोठमोठ्या बाजारपेठा नव्हेत. भविष्यातील खेड म्हणजे समृद्ध, स्वावलंबी आणि तंत्रज्ञान-समृद्ध खेड याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. ला. रोहन विचारे माजी अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात आधुनिक साधनांच्या मदतीने पाण्याचे नियोजन, रस्ते, शिक्षण व्यवस्था हे सर्व डिजिटल पद्धतीने होईल, हे भविष्यातील खेडचे वैशिष्ट्‌य असेल असे सांगितले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ला. उत्तम कांबळे व ला. ओम जाधव यांनी केले. परीक्षकाच्या मनोगतात ला. उत्तम कांबळे यांनी शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न, ऑनलाइन शिक्षणाची सुविधा प्रत्येक मुलापर्यंत पोहोचेल, तज्ञ डॉक्टर्सची सेवा सहज मिळेल, या आणि अशा भविष्यातील वेध घेणार्‍या गोष्टींची माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल कौतुक केले. मुख्याध्यापक बोधे यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांनी आपल्या शाळेसाठी व समाजातील सर्व स्तरातील घटकांसाठी अनेक उपक्रम राबवले. आपल्या शाळेसाठीसुद्धा अनेक स्तुत्य उपक्रम राबवले याबद्दल शाळेला व विद्यार्थ्यांना हे उपक्रम नेहमीच स्मरणात राहतील. असे सांगून मनापासून कौतुक केले. स्पर्धेनंतर प्रथम चार क्रमांकांना बक्षीस व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र लायन क्लब चे उपाध्यक्ष अविनाश दळवी यांच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमास नवभारत हायस्कूल भरणेचे प्राचार्य बोधे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष चाळके, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, सचिव ओम जाधव, कोषाध्यक्ष माणिक लोहार, वसतीगृहाचे अधीक्षक हटकर मॅडम, गोरीवल उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg