loader
Breaking News
Breaking News
Foto

आबलोली येथे शिवसेना (उबाठा) पक्षाची बैठक उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठ येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची जिल्हा परिषद, पंचायत समीती निवडणुकी संदर्भात पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक शिवसेनेच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली. आमदार भास्करशेठ जाधव यांच्या आदेशा प्रमाणे पडवे जिल्हा परिषद गटाची प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न झाली.यावेळी पडवे जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून सचिन बाईत आणि पडवे पंचायत समीती गण निवडणूक उमेदवार म्हणून रवी आंबेकर यांच्या नावाला या बैठकीत टाळ्यांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी यांनी शिक्कामोर्तब केले व मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार‌च असा निर्धार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी हि निवडणूक शिवसेना पक्षासाठी प्रतिष्ठेची असून कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका, आपण स्वत:च उमेदवार आहोत असे समजून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करा, अफवांवर विश्वास ठेऊ नका एक एक मतदार जोडा, शिवसेना पक्षाची मशाल निशानी घरा- घरात पोहचवा, वाडी वस्तीवर आणि संपूर्ण जिल्हा परिषद गटात मशाल निशानी आणि आमदार भास्करशेठ जाधव यांनी केलेली विकास कामे सांगा वाडी वस्तीवर काय काय समस्या अडचणी आहेत त्या जाणून घ्या आपण आमदार भास्करशेठ जाधव यांच्या माध्यमातून सोडवू आता एकच लक्ष जिल्हा परिषद आणि पचांयत समीतीत आपण जिंकूच या निर्धाराने शिवसैनिकांनी कामाला लागूया असा ठाम निर्धार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या बैठकीला जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांतशेठ बाईत उर्फ आबा बाईत, शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन बाईत, सचिव विलास गुरव, उप तालुका प्रमुख काशिनाथ मोहिते, नरेश निमूणकर, विभाग प्रमुख रवी आंबेकर यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर चंद्रकांतशेठ बाईत उर्फ आबा बाईत, काशिनाथ मोहिते, सचिन बाईत, विलास गुरव, रवी आंबेकर, माजी सभापती पुर्वीताई निमूणकर, नरेश निमूणकर, शिवसनेचे युवा उप जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, वनिता डिंगणकर, जगदिश गडदे, सुजित सुर्वे, दिलीप यद्रे आदी. उबाठा शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg