loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. राजघराण्याने सुंदरवाडीचा पाया रचला, आता सुनबाई सावंतवाडीच्या चौफेर विकासाचे काम करतील. भाजप त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार आहे असे त्यांनी सांगितले. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, विशाल परब, शहर अध्यक्ष तथा उमेदवार सुधीर आडीवरेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, राजू बेग, ॲड. अनिल निरवडेकर, ॲड. ऋजूल पाटणकर, गोपाळ नाईक, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगांवकर, वेदिका परब, अमित गवंडळकर, दीपाली भालेकर, मेघा डुबळे, समृद्धी विर्नोडकर, ॲड. संजू शिरोडकर, दादू कविटकर, संध्या तेरसे, निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, महेशर शेख, वीणा जाधव यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनातून विकास व्हावा व येथील दरडोई उत्पन्न वाढावे हा विचार तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांचा नेहमीच राहिला आहे. आज हा विचार पुढे नेण्याचं काम आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले करीत आहेत. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून माध्यमातून येथील महिलांना व बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे त्यांचे व्हिजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून त्यांचं हे व्हिजन पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चितच करू असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, धुळ्यात राजघराण्याच्या राजमाता निवडणूक लढवीत असल्याने तेथील लोकांनी व सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्यांना व सर्व पॅनलला बिनविरोध निवडून दिलं. त्यामुळे सावंतवाडीतील शहरवासियांनीही याचा विचार करावा. सिंधुदुर्गातील प्रत्येक नगरपरिषद भाजपच्या ताब्यात द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याला दत्तक घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लहानपणापासून सावंतवाडी शहर बघत आलोय. मोती तलावाच आकर्षण आजही आहे. शहराला सौंदर्य आहे. शुभकार्याला श्री देव पाटेकराची आठवण आम्ही करतो. देव पाटेकर सावंत-भोसलेंसोबत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात देखील राजघराण्याच योगदान आहे.

टाईम्स स्पेशल

दाणोलीचे समर्थ साटम महाराजांच्या सेवेचा व्रत हे राजघराण्याने घेतलं. ऐतिहासिक राजघराण्याला आध्यात्मिक जोड त्यांनी दिली. त्यामुळे अशा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा असलेल्या राजघराण्याच्या लेकीसोबत येतील जनता निश्चितच पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंतवाडीच्या संस्थानकालीन राजघराण्याने विजेची गरज न लागता केवळ गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. आज शहरात येणार पाणी राजघराण्याच्या पुण्याईने येत याची जाण ठेवावी. दुरदृष्टीन केलेला विचार यातून दिसतो. लोकसंख्या वाढली असल्याने ड्रेनेज सिस्टीममध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. या व अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी व नवे प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. त्यासाठी पार्लमेंट तू पंचायत एक विचारांच सरकार असणं आवश्यक आहे. त्यामुळे विकासाची गंगा शहरात आणण सोपं होईल, असं मत व्यक्त केले. ते म्हणाले, सावंतवाडीत आरोग्य सेवा तसेच इतर प्रशासकीय व खाजगी कामांसाठी ग्रामीण भागातील लोक नेहमी शहरात येतात. यावेळी नागरी सुविधांचा बोजा शहरावर पडतो. त्यामुळे नागरी सुविधांसोबतच येथे कायमस्वरूपी अशा आरोग्य सुविधा तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg