loader
Breaking News
Breaking News
Foto

सातत्यपूर्ण पाठपुराव्याने देगावचा विकास साधता आला – मुजीब रुमाणे

संगलट खेड (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील देगाव–कातळवाडी येथे शिवशक्ती सहकार मित्र मंडळाच्या सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याने या परिसरातील विकासाची नवी दिशा निश्चित केली आहे. “आमदार सचिन अहिर यांचा निधी आणि अमोल किर्तिकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा नसता तर हे महत्त्वाचे काम वेगाने मार्गी लागले नसते. ग्रामीण भागात दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देगाव व आसपासच्या वाड्यांमध्ये सुरू असलेल्या विविध कामांना गती मिळाली आहे आणि पुढील काळातही ‘विकास थांबणार नाही’ ही भूमिका आम्ही कायम ठेवणार आहोत,” असे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाणे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देगांव–कातळवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांच्या निधीतून आणि खासदार अमोल किर्तिकर यांच्या प्रयत्नातून मंजूर सभागृहाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. गावाला बहुपयोगी सुविधा मिळाव्यात आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी एक भक्कम पायाभूत सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे सभागृह महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, दापोली तालुका प्रमुख ऋषीकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, खेड तालुका प्रमुख दत्ता भिलारे, विभाग समन्वयक पांगारी गट संजय रमाणे, विभाग प्रमुख रमाकांत शिंदे, उसगाव विभाग प्रमुख रमेश भैरमकर, उपविभाग प्रमुख प्रकाश खळे, देगाव उपसरपंच विश्लेषा बाईत, कोंढे शाखा प्रमुख जयवंत राजीवले तसेच जयवंत बेर्डे, अय्याज खोत, बाळकृष्ण बारे, काशीराम करंजकर, गंगाराम बाईत, सुरेश करंजकर, भागोजी बाईत, रामचंद्र गोलांबडे, दिनेश करंजकर, हरिश्चंद्र देवळे, संदीप गोलांबडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg