loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 122 अर्ज वैध ,केतन शेट्ये, फरजाना मस्तान यांचे आक्षेप फेटाळले

रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया आज पूर्ण झाली. यामध्ये अर्धवट माहिती, काही त्रुटीमुळे नगराध्यक्षपदाचा १ व १० नगरसेवकपदाचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. २ अर्जावर आक्षेप नोंदवण्यात आल्याने त्यावर सायंकाळी उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. उबाठाचे उमेदवार केतन शेट्ये व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या फरजाना मस्तान यांच्याविरोधात आक्षेप सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी फेटाळले. नगराध्यक्षपदासाठी 6 आणि नगरसेवकपदासाठी 122 अर्ज वैध ठरले आहेत. 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालिका निवडणुकीसाठीची छाननी प्रक्रिया आज दुपारी तीन वाजेपर्यंत चालली. प्रभाग 4 ब मधून केतन उमेश शेट्ये यांच्या विरोधात मालमत्ता कर भरला नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. शिवसेनेच्या इलियाज खोपेकर यांनी आक्षेप घेतला होता. यासाठी 8 नोव्हेंबरला नगर पालिकेने काढलेल्या नोटीशीचा आधार घेण्यात आला होता. याबाबत शेट्ये यांच्या वतीने ॲड. हर्षवर्धन गवाणकर यांनी बाजू मांडली. नोटीस मिळाल्यानंतर मालमत्ता कर पालिकेत भरण्यात आला असून पालिकेने याबाबत नाहरकत प्रमाणपत्र दिलेले असल्याची कागदपत्र सादर केली. या आक्षेपावर निर्णय देताना केतन शेट्ये यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. तर फरजाना इरफान मस्तान या महिला उमेदवाराविषयीही तीन आपत्यांबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता. अफ्रिन होडेकर यांनी हा आक्षेप नोंदविला. परंतु त्याबाबतही सुनावणी होऊन सायंकाळी उशिरा त्यांच्या अर्ज वैध ठरवण्यात आला. छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठीचा एक अर्ज आणि नगरसेवकपदासाठीचे दहा अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg