loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण तालुका बळीराज सेना महिला आघाडी अध्यक्षपदी दुर्वा पानवलकर

आबलोली (संदेश कदम) - पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे कोकण दौर्‍या नंतर बळीराज सेनेने आपली राजकीय ताकद चांगलीच वाढविली आहे. दोन दिवसापूर्वी दापोली तालुका अध्यक्षपदी जेष्ठ नेते काशीराम पोसकर यांची निवड झाल्या नंतर आज चिपळूण येथे बळीराज सेनेमध्ये जलद गतीने हालचालीना वेग आला जिल्हा अध्यक्ष आज चिपळूण मध्ये दाखल झाले होते. त्यांनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या. पिंपरी खुर्द येथे पार पडलेल्या चर्चा सत्रामध्ये तब्ब्ल पाच कार्यकर्ते बेसिक अध्यक्ष पदासाठी इच्छुक राहिल्याने चिपळूण अध्यक्ष पदाचा निर्णय जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी राखून ठेवला मात्र चिपळूण तालुका महिला आघाडी साठी जिल्हा अध्यक्ष यांनी ग्रामीण भागातील महिलेला तालुका अध्यक्ष पदाची सुवर्ण संधी दिली येथील अति ग्रामीण भागातील ताम्हणंमळा येथील दुर्वा दीपक पानवलकर यांना तालुका स्तरावरील मोठया पदाची संधी दिल्याने बळीराज सेनेने मोठा राजकीय इतिहास नोंदविला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज ताम्हाणे येथे पार पडलेल्या एका बैठकी मध्ये त्यांची नियुक्ती करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या बाबत बोलताना जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी म्हटले आहे की, उत्तर रत्नागिरी जिल्हा मध्ये बळीराज सेनेचे संघटन पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे आदेशानुसार वाढत आहे. चिपळूण तालुका अध्यक्ष पदाचा तिढा देखील येत्या आठ दिवसात सोडविण्यात येईल तसेच युवक अध्यक्ष देखील देण्यात येणार आहे बळीराज सेनेची ताकद आता वादळी ठरणार असून सर्व सामान्य जनतेला एक नवा पर्याय म्हणून बळीराज सेनेचे नाव घेतले जात आहे आजच्या चिपळूण तालुका दौर्‍यात बळीराज सेनेचे विविध गावातून पदाधिकारी यांनी चर्चा सत्र मध्ये सहभाग नोंदविला यावेळी गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड व तालुका उपाध्यक्ष संतोष पाष्टे, गुहागर विधानसभा मतदार संघ महिला आघाडी प्रमुख ऐश्वर्या कातकर यांचे सह चिपळूण तालुक्यातील विविध भागातील नवे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

चिपळूण तालुक्यात आता बळीराज सेनेचे नवे पर्व सुरु झाले असून बेसिक तसेच युवक व महिला आघाडी मध्ये सर्व च्या सर्व नवीन कोरे चेहरे देण्यात येतील असे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी स्पष्ट केले. सामाजिक संघटन आणि ग्रामीण व शहर भागात जनतेची सेवा करण्यासाठी बळीराज सेना सर्व ताकदीनी उतरेल चिपळूण शहर साठी नवा अध्यक्ष लवकरच देण्यात येणार आहे. या बाबतची चाचपणी सुरु आहे अशी माहिती बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg