loader
Breaking News
Breaking News
Foto

अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींसोबत विकास योजना दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्या - ना योगेश कदम

खेड (प्रतिनिधी) - दापोली-मंडणगड-खेडमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा आज दापोली येथे नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाला. शेतकरी आणि शासन एकाच नाण्याच्या दोन बाजू, असुन त्यांचा योग्य ताळमेळ साधने अतिशय गरजेचे आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींसोबत सर्व विकास योजना सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या जेणेकरून ज्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवास समृद्ध करण्यास होईल, असे प्रतिपादन मंत्रीमहोदयांनी मेळाव्या प्रसंगी केले. याप्रसंगी दूध उत्पादक शेतकरी म्हणून तरुणांचा आकडा जिल्ह्यात वाढला आहे, त्याबद्दल अभिनंदन केले. तसेच सर्व संबंधित योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भौगोलिक विकास होत राहणार परंतू दूध उत्पादक शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनीची तात्काळ स्थापना करावी, असे निर्देश देखील उपस्थित अधिकाऱ्यांना मेळाव्यात दिले. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधिर कालेकर, चिपळूण पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ. दत्तात्रय सोनावणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, दापोली तालुका प्रमुख उन्मेष राजे, मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, दापोली उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, माजी जि.प. समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, अनील महाडिक, सर्व अधिकारी आणि दूध उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg