loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब रत्नागिरी आयोजित वॉकथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

रत्नागिरी - लायन्स क्लब ऑफ यांच्या वतीने व समर्थ इन्व्हेस्टमेेंटस् यांच्या सहकार्याने वॉकथॉन मधुमेहाबाबत जनजागृती साठी जलद चालण्याची फिटनेस स्पर्धा आज भाट्ये बीच येथे सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता स्वागत व वॉर्म-अप सत्राने झाली. स्पर्धेची सुरुवात लायन्स क्लब अध्यक्ष ला संजय पटवर्धन यांनी श्रीफळ वाढवून केली. स्पर्धेमधे ४०+ महिला सुमारे २५, ४०+ पुरुष सुमारे ५०, ५०+पुरुष सुमारे ३०, ६०+ पुरुष सुमारे २० (अशा वयोगटातील एकूण सुमारे १२५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. एन्ट्री पूर्णपणे मोफत असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद उल्लेखनीय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समुद्रकिनार्‍याच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत सर्वच सहभागी उत्साही व ऊर्जा-संपन्न दिसून येत होते. ‘निरोगी जीवनशैली आणि नियमित चालण्याचा संदेश’ हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट सफल झाले. स्पर्धा सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली. प्रत्येक वयोगटातील पहिल्या तीन विजयी स्पर्धकांना ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि अभिनंदनपर गौरव करण्यात आला. तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. या स्पर्धेसाठी कोस्टल मॅरेथॉनच्या संयोजकांनी उत्तम सहकार्य केले व या स्पर्धेचे परीक्षक म्हणूनही काम केले. उपस्थित मान्यवरांनी सर्व स्पर्धकांचे व संयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रम संपन्न झाल्यावर सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष संजय पटवर्धन, ट्रस्टचे अध्यक्ष संतोष बेडेकर, समर्थ इन्वेस्टमेंटचे अभिजीत सरदेसाई, प्रिया थिटे, अनिरुद्ध थिटे, लायन्स स्पोर्ट कमिटी अध्यक्ष सचिन पानवलकर व लायन्स क्लबचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बहुमूल्य योगदान दिले. तसेच भाट्ये गावचे माजी सरपंच श्री.भाटकर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा वॉकथॉन रत्नागिरीकरांसाठी आरोग्य व फिटनेसचा प्रेरणादायी उत्सव ठरला. कार्यक्रम पूर्ण झाल्यावर लायन्स क्लबतर्फे किनार्‍यावरील कचरा उचलून स्वछता अभियान राबविण्यात आले. रत्नागिरीकरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व उत्स्फूर्त सहभागाबद्दल क्लबकडून आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg