loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली येथे २७ नोव्हेंबर रोजी होणार पुरातन शिवलिंग मंदिराचा जीर्णोद्धार

दोडामार्ग (प्रतिनिधी) - पांडवकालीन इतिहास लाभलेल्या साटेली गावातील ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिराच्या ठिकाणी २७ नोव्हेंबर रोजी पुरातन शिवलिंग मंदिराचा जीर्णोद्धार तसेच शिखरकलश प्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार आहे. या निमित्ताने २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. सातेरी मंदिराच्या आवारात साफसफाई, मंडप उभारणे सुरू झाले आहे. गावातील ग्रामस्थ तसेच देवस्थान कमिटी उत्सव समिती घरोघरी जाऊन निमंत्रण देत आहेत. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन साटेली ग्रामस्थ यांनी केले आहे. साटेली सातेरी मंदिराच्या ठिकाणी पांडवकालीन पुरातन शिवलिंग नंदी, मंदिरे होती. या ठिकाणी नवीन मंदीर तसेच देवतांच्या मूर्ती पुन;प्रतिष्ठापना सोहळा करण्याचे ठरवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील सर्व ग्रामस्थ यात सहभागी झाले आहेत. मंगळवारी २५ नोव्हेंबर पासून सकाळी धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. यात गणपती पूजन, श्राध्दांत, पुण्याहवाचन, प्राकार शुध्दी देवतांचे शुध्दीकरण, अभिषेक, इतर कार्यक्रम, तसेच २६ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम सादर होणार आहेत. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता कार्यक्रम सुरू होणार आहेत. शिखरकलश, प्रतिष्ठापना, अकरा वाजून दहा मिनिटांनी महादेव लिंग स्थापना, महापूजा, बलिदान, आरती, गार्‍हाणे, दर्शन सोहळा, नंतर महाप्रसाद, तसेच राञी संत बाळुमामा यांच्या जीवनावर आधारित दशावतार नाटय प्रयोग सादर होणार आहे. गेल्या दहा बारा दिवसापासून या सोहळ्याची तयारी जोरदार सुरू झाली आहे. मंदिराच्या आवारात साफसफाई केली आहे.

टाईम्स स्पेशल

बुधवारी देखील गावातील ग्रामस्थ महिला याना साफसफाई करण्यासाठी निमंत्रित केले आहे. शिवाय गावात घरोघरी जाऊन निमंत्रण दिले जात आहे. प्रत्येक वाडीवर जाऊन घरोघरी जाऊन सांगितले जात आहे. शिवाय लाऊडस्पीकर सांगितले जात आहे. साटेली गावात पुरातन शिवलिंग मंदिराचा जीर्णोद्धार तसेच शिखरकलश प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने गावात संपूर्ण मांसाहार, मद्यपान यावर निर्बंध घातले आहेत. हा कार्यक्रम होईपर्यंत कुणीही घरात मासे, मटण, खाऊ नये, मद्यपान करू नये असे कळविले आहे. गेल्या सोमवार पासून गावात शाकाहारी जेवण घेतले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg