loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषदेसाठी ८ नगराध्यक्ष अर्जांसह ९० नामनिर्देशनपत्रे दाखल

खेड (वार्ताहर) : - येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या ८ अर्जांसह ८२ नगरसेवक पदासाठी अशी एकूण ९० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. नगरपरिषदेच्या १० प्रभागातील २० जागांसाठी निवडणूक होत असून निवडणूक नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत दि.१७ नोव्हेंबरपर्यंत असताना नगराध्यक्षपदासह तब्बल ९० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. त्यामुळे सोमवारी या अखेरच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी उमेदवारांची एकच झुंबड उडाली होती. कोणताही गोंधळ न होता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत पार पडली. खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रभाग क्र. ७ मधील शिंदे शिवसेनेच्या माधवी राजेश बुटाला यांनी सर्वसाधारण महिला गटातून २ उमेद‌वारी अर्ज दाखल केले आहेत. वैभवी वैभव खेडेकर यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. सपना ऋषिकेश कानडे आणि कौसर बशीर मुजावर यांनी महाविकास आघाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सीमा नितीन जाधव असे एकूण नगराध्यक्ष पदासाठी ८ अर्ज दाखल झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर नगरसेवक पदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या ८२ उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:- प्रभाग क्रमांक १ अ - वर्षा तुषार सापटे शिंदे गट, आशा अनिल सनगरे अपक्ष व भाजप, चिंतल प्रदीप भंडारे उबाठा, १ ब -निकेतन अनंत पाटणे शिंदे गट, संदेश शिवराम भुवड भाजप, प्रभाग क्रमांक २ - दीप्ती दत्ताराम शिगवण शिवसेना, मनीषा राजन निर्मळ उबाठा,२ ब - जावेद अब्दुल गफूर कौचाली अपक्ष, महंमद अब्दुल हमीद पालेकर शिवसेना, मन्सूर अहमद मुकादम शिंदे शिवसेना, जिशान बशीर हमदुले उबाठा, अनिल वसंत मोरे अपक्ष, रहीम युसुफ सहिबोले भाजपा, प्रभाग क्रमांक ३- प्रकाश देसाई भाजपा, नीता केतन आंब्रे शिंदेगट, अश्विनी अशोक दरेकर शरद पवार गट, ३ ब - सुनील बाबुराव दरेकर शिंदे गट, चंद्रशेखर केरूशेठ पाटणे उबाठा, प्रभाग क्रमांक ४ - शर्मिला सागर पवार उबाठा, अब्दुल बासित मुरादअली सुर्वे एनसीपी, ४ ब - इम्तियाज अहमद अब्दुल खोत शिंदे गट, तौसिफ अब्दुल कादिर खोत शिंदे गट, वझुद्दीन मोहम्मद परकार राष्ट्रवादी, अंजुम जबीर कुरणे शिवसेना, प्रभाग क्रमांक ५ - यश राकेश खेडेकर शिंदे गट, सुरेश नारायण खेडेकर भाजपा, बाळाराम बाळू खेडेकर उबाठा, रूपाली राकेश खेडेकर शिवसेना,५ ब - जयमाला जगदीश पाटणे एनसीपी, आरती महेंद्र पवार शिंदे गट, अक्षदा अमोल दळवी शिवसेना, सुनिता सागर खालकर उबाठा, वैभवी वैभव खेडेकर भाजपा, प्रभाग क्रमांक ६- रूपाली ओंकार कुलकर्णी उबाठा, नेहा विजय पवार भाजपा, अपेक्षा अनिल सदरे एनसीपी, अक्षदा अमोल दळवी शिंदे गट, ६ ब- सतीश गणपत चिकणे शिवसेना, संदीप नारायण सासणे भाजप, सतीश प्रकाश कदम उबाठा, भूषण सदानंद काणे अपक्ष, अनिल रामचंद्र सदरे एनसीपी, प्रभाग क्रमांक ७ अ - वसंत बळीराम पिंपळकर भाजप, प्रणव प्रमोद महापुस्कर शरद पवार गट, स्वप्निल पांडुरंग सैतवडेकर शिंदे सेना, ७ ब - स्वप्नाली राकेश चव्हाण भाजपा, कौसर बशीर मुजावर अपक्ष, जागृती सुयश लंबाडे शिवसेना, श्रद्धा सागर कवळे अपक्ष, प्रभाग क्रमांक ८ - प्रेमळ श्रीधर चिखले शिंदे गट, स्वराज विक्रांत गांधी एनसीपी, रसिका राकेश खेडेकर शिंदे गट, ऋषिकेश मनोहर कानडे उबाठा, ८ ब - प्रीती स्वरूप मांजरेकर भाजप, सुरभी सुनील धामणस्कर उबाठा, प्रभाग क्रमांक ९ -- आरोही संतोष शिंदे शिंदेगट, अनाम नईम चौगुले अपक्ष व भाजपा, ९ ब - भालचंद्र रवींद्र साळवी भाजपा, भूषण शांताराम चिखले शिंदे गट, वैजेश रघुनाथ सागवेकर भाजपा, सुनील मनोहर धामणस्कर उबाठा, प्रभाग क्रमांक १० अ रेश्मा अब्दुल रहूफ खतीब शिंदे गट, नाझीमा शफिला खान एनसीपी,१० ब - आरिफ फकी महंमद मुल्लाजी शिवसेना, बशीर अब्दुल अहमद मुजावर काँग्रेस , दानिश अजीज मनियार अपक्ष अशी नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg