loader
Breaking News
Breaking News
Foto

नगराध्यक्षपदासह १७ नगरसेवक मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणणार - आमदार किरण सामंत

लांजा (संजय साळवी) - लांजा - कुवे नगरपंचायत निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस- भाजपा महायुतीचे सर्वच्यासर्व म्हणजे नगराध्यक्षपदासह १७ नगरसेवक मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणणार म्हणजे आणणारच असा ठाम विश्वास लांजा - राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी लांजा येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. लांजा-कुवे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल किर्ती महल शेजारी शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयाचे मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यानंतर आमदार किरण सामंत यांनी आपल्या रेस्ट हाऊस येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला लांजा शहरातून सुमारे दोन हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. आता तर माजी आमदार राजन साळवी आणि अविनाश लाड हे आमच्या पक्षात आले आहेत. त्यामुळे लांजा शहरात शिवसेनेची ताकद वाढली असून नगराध्यक्षपदाचा उमेदवार किमान चार हजारांहून अधिक मताधिक्क्याने तर नगरसेवकपदाचे उमेदवार लक्षणीय मताधिक्याने निवडून येतील. रस्ते, गटारे, पाखड्या, पाणी यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र यापलीकडे जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून "लांजा शहर, सुंदर शहर!" ही संकल्पना आम्ही राबवित आहोत. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा, वृद्ध नागरिकांसाठी नमो उद्यान, कला रसिकांसाठी एक सुसज्ज असे कलादालन, शहरातील सर्व ऐतिहासिक तळ्यांचे सुशोभीकरण, सर्व शासकीय इमारतींचे नूतनीकरण, तसेच नगरपंचायतीला अग्निशमन बंब पुरविणे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लांजा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पाणी पुरवठा योजना राबविण्याचा आमचा मानस आहे. सौर ऊर्जेचा वापर करून ही योजना राबविली तर लाईट बिल कमी येवून त्याचा फायदा नागरिकांना कमी पाणीपट्टीच्या माध्यमातून होईल. याशिवाय बेरोजगारीचा मुख्य प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही याठिकाणी उद्योग, व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच नोकरीसाठी लागणारे विविध कोर्सेस देखील येथील मुलांना उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रत्यनशील आहोत. लांजा व राजापूर या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागातील युवक नोकरी निमित्त मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहे. पर्यायाने ग्रामीण भागातील घरे मोठ्या प्रमाणात बंद होत चालली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत व खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार किरण सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाईम्स स्पेशल

डीपी प्लॅन बाबत बोलताना आमदार किरण सामंत यांनी सांगितले की, डीपी प्लॅनमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. नऊ मीटरच्या रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली असून संपूर्ण शहरातील एनडीझेड (नो डेव्हलपमेंट झोन) उठविण्यात आलेला आहे. डीपी प्लॅनबाबत ज्या काही हरकती आल्या होत्या त्यांचा पूर्णपणे विचार करूनच त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या डीपी प्लॅनमध्ये काहीच त्रुटी राहिलेल्या नाहीत. विरोधक या विषयाचे केवळ राजकारण करीत आहेत. मी बरं बोलत नाही, तर मी खरं बोलतो म्हणून ते लोकांना सुरुवातीला आवडत नाही. मात्र मागाहून लोकांना माझे म्हणणे पटते. लांजा शहरातील जनता सुज्ञ आहे. ती अशा अपप्रचाराला बळी पडणार नाही. बंडखोर उमेदवारांबाबत बोलताना आमदार किरण सामंत यांनी बोलताना सांगितले की, त्यांनी वेळीच माघार घेवून महायुतीच्या उमेदवारांचे काम केले नाही तर त्यांच्यावर पक्षाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल. पक्षाच्या विरोधात जावून काम करणाऱ्याला सोडणार नाही. मग तो कोणीही असो. कारवाई ही होणारच असे आमदार किरण सामंत यांनी यावेळी बोलताना ठणकावून सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg