loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत भाजपच्या प्रचारात पालकमंत्री नितेश राणे यांनी गल्लोगल्ली फिरत केला प्रचार

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीत कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांशीही ते गाठीभेटी घेत आहेत. भाजपचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. सालईवाडा येथे त्यांनी ही बैठक घेतली. यावेळी जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आपल्या विचारांचा नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून देण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. देशात, राज्यात भाजपच सरकार आहे. त्यामुळे सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजपचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार अमित गवंडळकर, मेघा डुबळे, प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ‌

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg