loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली येथील शेकडो महिलांकडून पुरातन शिवलिंग नंदी मंदिराच्या मूर्तींवर जलाभिषेक

साटेली (तुळशीदास नाईक) -पांडवकालीन इतिहासाची साक्ष असलेल्या साटेली गावात पुरातन शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा गुरूवारी होत आहे. यामुळे संपूर्ण साटेली गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शेकडो ग्रामस्थ या धार्मिक विधी मध्ये गेले दोन दिवस सहभागी झाले आहेत. बुधवारी गावातील शेकडो महिला भगिनी यांनी ढोलताशांच्या गजरात तसेच देवतांचे अवसार यांनी गणेश चतुर्थी सणाला गौरी आणल्या जातात या विहिरीवर जाऊन गंगा पूजन करून विधीवत पूजाअर्चा करून विहिरीतील गंगाजल तांब्याच्या कलश मध्ये भरून ते भव्य मिरवणूक काढत सातेरी मंदिराच्या ठिकाणी आणून शिवलिंग नंदी, तसेच कलश या मूर्तीवर जलाभिषेक, जलधिवास विधी पार पडला. या नंतर ब्राह्मण करवी इतर विधी पार पडले. आज गुरूवारी ठरलेल्या ११.१० मिनिटांनी शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली गावात कित्येक वर्षानंतर अनेक पिढ्या नंतर पुरातन शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पाहाण्याचे भाग्य साटेली गावातील ग्रामस्थ तसेच देवस्थान निगडित असलेल्या गावातील भक्तांना मिळत आहे. हे भाग्य म्हणावे लागेल. शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा जय्यत तयारी झाली आहे. अनेक गावातील ग्रामस्थ मानकरी शिमशेजारी याना निमंत्रण दिली आहेत. बुधवारी सकाळी गावात ठरल्या प्रमाणे गावातील शेकडो सुहासिनी महिला यांनी नऊवारी साडी परिधान करून गंगाजल आणण्यासाठी जमा झाल्या या नंतर सातेरी मंदिराच्या ठिकाणी सर्व देवतांना आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

या नंतर अवसार उभे राहिले. या ठिकाणी धार्मिक विधी पार पडले या नंतर ढोलताशांच्या गजरात श्री देवी शांतादुर्गा पुरमार मंदिराच्या ठिकाणी देवतांना सांगणे सांगून नंतर गंगाजल आणण्यासाठी महिला गोळा झालेल्या विहिरीच्या ठिकाणी येऊन ब्राह्मण तसेच यजमानी कडून विहिरीतील गंगाजल यांचे पूजन करून नंतर ते महिलांच्या तांब्याच्या कलश मध्ये ओतण्यात आले. या नंतर ओम नमो शिवाय नामस्मरण करत भव्य मिरवणूक काढत हे गंगाजल मंदिराच्या ठिकाणी आणून स्थापना करण्यासाठी आणलेल्या मूर्तीवर जल अभिषेक, जलधिवास विधी पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg