loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे नेत्यांविरोधात अपशब्द काढणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल : मुजोर रिक्षाचालकाची कान पकडून माफी

ठाणे (प्रतिनिधी ): ठाण्यात पोखरण रोड येथील गांधीनगर भागात शिवसेना शाखेजवळ दोन रिक्षा चालक धिंगाणा घालत असताना दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या या मुजोर परप्रांतिय रिक्षा चालकाने अखेर कान पकडून उठा-बशा करत माफी मागितली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेत दोन रिक्षा चालक धिंगाणा घालत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. यामध्ये एक रिक्षा चालक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी अपशब्द काढत आहे. तसेच, मनसे पक्षाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले.या प्रकरणी रिक्षा चालक शैलेंद्र यादव (३५) आणि राकेश यादव (२७) या दोघांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील शैलेंद्र याला पोलिसांनी अटक केली आहे. तर राकेश याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १९६ (१) (अ), ३५२, ३५१ (२) आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान अविनाश जाधव यांनी थेट इशारा दिला. तसेच परप्रांतिय रिक्षा चालकाला चोपही दिला. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात प्रसारित झाले. याबाबतची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी रिक्षा चालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यापूर्वीच यातील एका रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.अटक झाल्यानंतर रिक्षा चालकाने . मी मद्य प्यायलो असल्याने माझ्याकडून हा प्रकार झाला असल्याचे कबुल केले. राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ केली त्याबद्दल अखेर माफी मागितली . त्याने माफी मागत उठा-बशा काढल्या.मी भविष्यात परत अशी चूक माझ्याकडून होणार नाही.असेही त्याने कबुल केले सदरची चित्रफीत मनसेने सोशल मीडियावर प्रसारित केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg