loader
Breaking News
Breaking News
Foto

सौ.सबुरी थरवळ व सहकार्‍यांना विजयी करा आणि न.प.ची किल्ली निश्‍चिंत मनाने त्यांच्याकडे सोपवा हीच देवरुखकरांना नम्र विनंती : रविंद्र माने

देवरुख (सुरेश सप्रे) - ‘‘देवरुख ही देवनगरी म्हणून ओळखली जाते तसेच देवरुखचा एक सुसंस्कृत शहर, धार्मिक पारांची नगरी व शैक्षणिक सुविधांचे शहर म्हणून लौकीक आहे. देवरुखच्या नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला सौ. सबुरी थरवळ यांच्यासारख्या शालीन व सोज्ज्वळ उमेदवार लाभल्या हे तर देवरुखकरांचे भाग्य होय. अत्यंत शांत, संयमी व सुसंस्कृत व्यक्तीमत्वाच्या सौ. सबुरी थरवळ यांच्या हाती देवरुख नगर पंचायतीची ‘किल्ली’ सोपवून देवरुख वासियांनी निश्ंिचत व्हावे’’ असे सडेतोड प्रतिपादन शिवसेना (उध्दव ठाकरे) ज्येष्ठ नेते व भूतपूर्व मंत्री ना. रविंद्र माने यांनी व्यक्त केले. नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर दै. ‘रत्नागिरी टाइम्स’साठी मुलाखत देताना त्यांनी आपली मते सडेतोडपणे व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री. रविंद्र माने हे कोकणातील एक सचोटीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितले, ‘‘देवरुख शहर हे मुंबई - गोवा महामार्गापासून नजिक आहे. म्हणूनच देवरुख शहराचा विकास ‘बिझनेस हब’ म्हणून करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे शहरातच नव्हे तर सार्‍या परिसरात उद्योग व्यवसायांना चालना मिळेल, तरुण, तरुणींना रोजगार मिळेल आणि समस्त देवरुख वासियांच्या हातात बक्कळ पैसा खुळखुळू लागले. त्यासाठी देवरुखमध्ये उत्तम नागरी सुविधा निर्माण कराव्या लागतील तसेच देवरुख शहर ‘बिझनेस हब’ होण्यासाठी आम्ही महाआघाडीची सर्व मंडळी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत’’ असे खणखणीत प्रतिपादन श्री. रविंद्र माने यांनी केले.

टाइम्स स्पेशल

श्री. रविंद्र माने विकासाचा प्रश्‍न निघाला की भरभरुन बोलतात. त्यांनी सांगितले, ‘‘सौ. सबुरी थरवळ या एक हरहुन्नरी व जनहितदक्ष नेत्या आहेत. एक सुसंस्कृत, शालीन व सभ्य नेतृत्व म्हणून देवरुख वासिय त्यांच्याकडे पाहतात. मध्यंतरीच्या काळात जे काही पहायला मिळाले किंवा जे काही कानावर येत होते त्याबद्दल काय बोलावे? म्हणूनच सुसंस्कृत देवरुखसाठी सुसंस्कृत व शालीन सौ. सबुरी थरवळ याच नगराध्यक्षा हव्यात’’ अशा सडेतोड शब्दात श्री. रविंद्र माने यांनी प्रतिपादन केले. श्री. रविंद्र माने विलक्षण तन्मयतेने बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘देवरुख शहराची भौगोलिक रचना पाहता काही अंगभूत समस्या आहेत. प्रशासनावर अंकुश नसल्याने विकास आराखडा मंजुर करण्यात सत्ताधार्‍यांना अपयश आले तसेच घनकचरा प्रकल्प, कचर्‍याची भेडसावणारी समस्या, उघडी गटारे व नाले, त्यामुळे उद्भवणार्‍या नागरिकांच्या आरोग्याची समस्या तसेच पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी आदी महत्वपूर्ण बाबींवर आम्ही सर्वांना सोबत घेऊन मार्ग काढणार आहोत. त्यासाठी देवरुख शहराच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ आम्ही तयार केला आहे’’ असे त्यांनी यावेळी नमूद केले. श्री. रविंद्र माने तडफेने बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘देवरुख नगरी ही जशी सभ्य व सुसंस्कृत आहे तसेच येथील नागरिक देखील पराकोटीचे सुसंस्कृत व सभ्य आहेत. आजवर देवरुख नगरीला अनेक कर्तबगार नेते लाभले. कै. बाबल्याशेठ सार्दळ, श्रीमती म्हापूसकर, देवरुख हायस्कूलचे विद्यार्थी प्रिय शिक्षक जनार्दन भागवत, कै. मनोहर गोखले, कै. दिलीपभाऊ सार्दळ असे अनेक सुसंस्कृत सरपंच देवरुखला लाभले. त्याचबरोबर निलम हेगशेट्ये, स्वाती राजवाडे, निलेश भुरवणे असे प्रामाणिक, उच्च विद्याविभूषित व जनहित दक्ष नगराध्यक्षही लाभले. देवरुखचे वातावरण सुसंस्कृत आहे व ते तसेच रहायला हवे असा आमचा अट्टाहास राहील’’ अशा खणखणीत शब्दात त्यांनी सारे काही स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg