loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबेडखुर्द येथे भव्य कुणबी समाज भवनाचे उद्घाटन

संगमेश्वर (प्रतिनिधी) – आंबेडखुर्द येथे कुणबी समाजाचे भव्य भवन उभे राहिल्याचा आनंद व्यक्त करत आमदार शेखर निकम यांनी कुणबी भवनाच्या वरील भागास उभे राहणाऱ्या वसतिगृहाच्या स्लॅब खर्चाच्या तरतूदीचे आश्वासन दिले. तसेच संतोष थेराडे कुणबी भवनाच्या उभारणीसाठी चांगली मेहनत घेत असल्याचे सांगितले . आंबेड खुर्द येथील कुणबी समाज भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संतोष थेराडे यांनी आमदार निकम यांनी भवन उभारणीसाठी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “कुणबी समाज भवन हे समाजाच्या ऐक्याचे प्रतीक आहे. सामाजिक उपक्रमांसाठी समाजाने सदैव पुढे येत रहावे,” असेही त्यांनी सांगितले. उद्घाटन प्रसंगी माजी खासदार विनायक राऊत व सहदेव बेटकर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संतोष थेराडे, सुरेश भायजे, चंद्रकांत फणसे, कृष्णा हरेकर, सुशील भायजे, नाना कांगणे, लांबे, अनिल बोले, सचिव शंकर बोले, सुनील गेल्ये, दत्ता लाखन, दत्ता ओकटे, विशाखा कुवळेकर, विजय कुवळेकर, बाळकृष्ण काष्ट्ये तसेच साडेबहात्तर खेड्यातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg