loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये ‘संविधान दिन’ संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये ’संविधान दिन’ साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त शाळेमध्ये संविधानातील जाहिरनाम्यात दिलेल्या मूलतत्वांचे वाचन करण्यात आले. शाळेतील समाजशास्त्र विषयाच्या विभागप्रमुख सौ. प्रिती नायर यांनी संविधान बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती सांगितली. त्याचबरोबर आपण आपल्या मूलभूत हक्कांचे पालन केले पाहिजे. आजचा दिवस हा भारताचा संविधान दिन म्हणून साजरा केला जात असल्याने त्याचा पूर्वइतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तसेच मसुदा समितीतील पदाधिकाऱ्यांची माहिती सांगितली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांमुळे भारताचे संविधान तयार झाले आहे. प्रजासत्ताक लोकशाही म्हणून भारताची ओळख केवळ संविधानामुळेच झाली आहे, असे सांगून त्यांनी संविधानाची पार्श्वभूमी सांगितली. तसेच विद्यार्थ्यांसमवेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg