loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या {शरद पवार गट} प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

श्रीवर्धन (प्रतिनिधी) - श्रीवर्धन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष घरत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडत सदरील कार्यालया शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास रायगड जिल्हा संघटक व श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनसे अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत श्रीवर्धन विधानसभा सरचिटणीस जुल्फीकार टोल, विधानसभा संघटक जलील काजी, श्रीवर्धन तालुका प्रभारी प्रकाश जाधव, माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर यांची उपस्थिती लक्षणीय होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रायगड जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष व नगरपरिषद उमेदवार फुजल बेवनाक, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रवींद्र चौलकर तसेच नगरसेवक उमेदवार विद्या कदम, सुफियान हदादी, शबनम दिवेकर, रशमी चौलकर, शिवराज चौले व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळा व रॅलीमुळे निवडणुकीच्या वातावरणात आणखी रंगत निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस {शरद पवार गट }पक्षाच्या तयारीला वेग आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg