loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळ्यात संविधान दिना निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भव्य अभिवादन

म्हसळा - बौद्ध समाज बौध्दजन पंचायत समिती म्हसळा व भारतीय बौद्ध महासभा तालुका म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाचे भाग्यविधाते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या भारतीय संविधानाच्या गौरवार्थ भारतीय संविधान गौरव दिन सोहळा साजरा करण्यात आला असुन भव्य रॅली काढून तमाम म्हसळा वासियांकडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही सर्व मुल्य ज्या देशात नांदतात असा भारत देश घडविण्यासाठी समाज हितासाठी, देशहितासाठी, राष्ट्र बांधणीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी स्वप्न पाहिले, तेच स्वप्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या स्वरुपात मांडले व भारत देशाला अर्पण केले अशा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात शाहिर भिमराव सूर्यतळ यांच्या सुंदर अशा संविधान गिताने करण्यात आली. संविधानावर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

यावेळी उपस्थित संविधान अभ्यासक प्रशांत गमरे, कार्यक्रम अध्यक्ष सुरेश जाधव, प्रांताधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, तहसिलदार सचिन खाडे, म्हसळा पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, गटविकास अधिकारी माधव जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत बिराजदार, वन अधिकारी पी. एम. पाटील, कृषी अधिकारी एस. डी. शिंदे, युवा उद्योजक सुशांत मोरे, समीर बनकर, सुरेश कुडेकर, महादेव पाटील, बबन मनवे, शाहीद उकए, जमादार , सुर्यकांत तांबे, चंद्रकांत पवार, मनोहर तांबे, सुमित सावंत, शाहिर भिमराव सुर्यतळ, संतोष जाधव, शशिकांत शिर्के, तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, महीला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाने देखील उत्तम सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg