loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण नगर परिषद निवडणुकीत १४१ अर्ज वैध; नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार रिंगणात

चिपळूण (प्रतिनिधी) :- चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. नगराध्यक्ष पदासाठी १३, तर नगरसेवक पदांसह मिळून एकूण १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. एका पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता १२९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या लढती स्पष्ट होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सर्व अर्जांची छाननी झाली. यामध्ये १४१ अर्ज वैध, तर १३ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांनी दिली. छाननीनंतर एकूण १२९ नामनिर्देशन पत्रे मतदानासाठी पात्र राहिली आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या १३ अर्जांपैकी ३ अर्ज बाद, तर ८ अर्ज वैध ठरले असल्याचेही विशाल भोसले यांनी सांगितले. चिपळूण नगर परिषदेत २८ नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत असून, सर्व अधिकारी व कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg