loader
Breaking News
Breaking News
Foto

आरपीएफ चिपळूणने प्रवाशाचे विसरलेले सामान तत्काळ केले परत

संगलट (खेड )(प्रतिनिधी) - प्रवासादरम्यान विसरलेल्या सामानामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन, रेल्वे संरक्षण दलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन अमानत’ मुळे मत्स्यगंधा एक्सप्रेस मध्ये स्वतः जवळील सामान विसरून गेलेल्या एका प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशाने ‘रेल मदद’ द्वारे तक्रार दाखल केल्यानंतर, आरपीएफ चिपळूण येथील कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण यांनी तातडीने कार्यवाही केली. त्यांनी ट्रेन क्रमांक १२६१९ ( matsyagandha Express) मध्ये विसरलेले प्रवाशाचे सामान त्वरीत शोधून ते सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण यांच्या जागरूकतेमुळे आणि उत्कृष्ट समन्वयामुळे हे काम कमी वेळेत पूर्ण झाले. त्यांनी सामानाची योग्य तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून ते कायदेशीररित्या मूळ मालकाच्या स्वाधीन केले. ​ही घटना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि हरवलेले सामान परत मिळवून देण्यासाठी आरपीएफ किती तत्पर आहे, हे दर्शवते. ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत, प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg