loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमध्ये रमेशभाई कदम यांच्या उमेदवारीने निवडणूकीत रंग चढला

चिपळूण- चिपळूण नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार रमेशभाई कदम यांना मोठे पाठबळ शहरात लाभत आहे. विकास कामाचा प्रचंड अनुभव असलेले श्री.कदम यांच्या उमेदवारीने चिपळूणमध्ये निवडणूकीला रंगत आणली आहे. चिपळूण शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेशभाई कदम यांना निवडून आणण्याची गरज मतदारांमधून व्यक्त होत आहे.१९७४ मध्ये नगरसेवक आणि १९८७ मध्ये नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊन चिपळूणचा कायापालट त्यांनी केला आहे, तर २००४ मध्ये आमदार म्हणून प्रभावी कामगिरी पार पाडली आहे. रमेशभाई कदम नगराध्यक्ष म्हणून कोकणात प्रथम क्रमांकाने मताधिक्य घेवून विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. रमेशभाईंशिवाय चिपळूणमध्ये कोणी प्रभावी नेता नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत नसल्याचेही राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg