loader
Breaking News
Breaking News
Foto

आर एच पी फाऊंडेशन तर्फे दिव्यांग व्यक्तीस व्हील चेअरची मदत

रत्नागिरी (जमीर खलफे) - सुप्रिया राहुल शिंदे वय 41 वर्ष मु.पो. फणसोप ता.जि. रत्नागिरी. शिक्षण ग्रॅज्युएट. वयाच्या तिसऱ्या वर्षी तापात इंजेक्शन दिल्याने उजव्या पायाला पोलिओ झाला. खूप औषधी उपचार करून हळू हळू चालायला लागली. पाचव्या वर्षी पायावरून ट्रक गेल्याने पायाचा अंगठा काढावा लागला. त्याही परिस्थितीत घरच्यांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. घरी मुलांच्या शिकवण्या घ्यायची.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

2010 साली राहुल शिंदे फणसोपं यांच्याशी लग्न झाले. तेही अपंग आहेत. मुंबईहून फणसोपंला आल्या. मिस्टर रिक्षा चालवतात. त्यांना एक मुलगा आहे. श्री राहुल शिंदे तो नववीत शिकतो. सुप्रियाना आधी चालता यायचे दोन वर्षांपासून संधिवातचा त्रास सुरु झाल्याने चालणं कमी झाले. डावा पाय भार पडून वाकडा झाला त्यावर भार देता येत नसल्याने घरात घसटत सर्व काम करायला लागायची.

टाईम्स स्पेशल

त्यांना आर एच पी फाउंडेशनची माहिती मिळाली. अध्यक्ष सादिक नाकाडे यांना भेटून सुप्रिया यांच्याविषयी सर्व माहिती दिली. सादिक नाकाडे यांनी संस्थेतर्फे नवीन व्हिलचेअर सुप्रिया शिंदेना दिली. त्यामुळे त्यांना घरातील काम कारण सोपं जाऊ लागले. नवरा आणि मुलगा मिळून त्यांना उचलून बेडवर ठेवायचे. तो त्रास कमी झाला. बाहेर जाताना व्हीलचेअरचा खूप उपयोग होऊ लागल्याने सुप्रिया आणि घरचे खूप खुश झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांनी व त्यांच्या परिवाराने आर एच पी फाउंडेशनचे मनापासून आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg