loader
Breaking News
Breaking News
Foto

उमेद'च्या सहकार्याने ग्रामविकासाचा नवा अध्याय

रत्नागिरी : ​उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू असलेल्या PRI-CBO Convergence प्रकल्पाने रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामविकासाच्या प्रक्रियेला एक नवी दिशा दिली आहे. दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हयात आयोजित करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या जिल्हास्तरीय मूल्यमापन कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेमुळे महिला सक्षमीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सक्रीय सहभाग वाढण्यास मदत मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावना करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. यावेळी, प्रकल्प अंतर्गत विभागात झालेल्या विकास कामांची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विजयसिंह जाधव , जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे, जिल्हा व्यवस्थापक श्रीम .साक्षी वायंगणकर , संगमेश्वर तालुका अभियान व्यवस्थापक रूपेश चव्हाण , तालुका व्यवस्थापक परमवीर जेजुरकर, युवराज राठोड, तसेच वळके गावचे सरपंच उत्तम सावंत , कोतवडे ग्रामपंचायत अधिकारी देवीदास इनगळे , प्रभाग समन्वयक , प्रभाग व्यवस्थापक , जिल्हा संसाधन व्यक्ती रत्नागिरी नुजहत नाकाडे, तालुका संसाधन व्यक्ति संगमेश्वर नसरीन खोत , तसेच पदाधिकारी , मास्टर सीआसी , बँक सखी , बालसभा प्रतिनिधी , अक्षरज्योती प्रतिनिधी , LRP ,CRP तेसच सर्व उपस्थित मान्वरांने आपले मनोगत व्यक्त केले . जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांना व्यवसाय व त्यातुन पुढे जाण्या करीता मार्गदर्शन व गावपातळीवर घनकचरा व्यवस्थापन व त्यातुन मिळणारे उत्पन्न यावर महिलांचा सहभाग व्हावा असे मत मांडले व प्रोजेक्टमध्ये छान कामगिरी झाली आणि पुढील वाटचाली करीता सर्वांना शुभेच्छा दिल्या .

टाइम्स स्पेशल

​कार्यशाळेचा मुख्य भाग म्हणून 'गॅलरी वॉक' आयोजित करण्यात आला होता. या गॅलरी वॉकमध्ये झालेल्या कामांचे चार्टद्वारे केलेले प्रेझेंटेशन पाहणी करण्यात आली. उपक्रमांचे गावाच्या विकासात मोठे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला. उमेद अभियानामुळे झालेले महिला सक्षमीकरण आणि या प्रोजेक्ट अंतर्गत बदललेली विचारसरणी याचे स्वागत अधिकारी उपस्थित आणि ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी केले. गॅलरी वॉक दरम्यान सर्व मान्यवर व पदाधिकारी यांनी ऍक्टिव्हिटीज समजून घेतल्या आणि त्यांची नियमितता महत्त्वाची असल्याचे नमूद केले. ​या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्काची माहिती देऊन, स्थानिक शासन प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया उभा करता येतो हे सिद्ध झाले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन हरचिरी प्रभागाच्या प्रभाग व्यवस्थापक शमिका नागवेकर यांनी केले . जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा-स्तरीय मूल्यमापन कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यात यश मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg