loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १५ व्या स्मृतीदिनानिमित्त "एक पुढाकार कर्करोगा विरुद्ध जागरूकतेकडे"

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील विष्णूपंत पवार मेमोरियल हॉस्पिटल,आणि पवार परिवार यांच्या वतीने कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १५ व्या स्मृतीदिनानिमित्त "एक पुढाकार कर्करोगा विरुद्ध जागरूकतेकडे" स्त्रियांचे स्तन कर्करोग, गर्भाशयाचे कर्करोग यांची तपासणी व निदान तसेच मासिक पाळी संदर्भातले आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून निदान, उपचार व सल्ला शिबिर विष्णूपंत पवार मेमोरियल हॉस्पिटल, श्रृंगारतळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य किसन पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिबिराची सुरुवात पवार कुटुंबीय, प्रमुख मान्यवर तसेच डॉक्टरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.विष्णूपंत पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.या कार्यक्रमासाठी किसन पवार, विजय पवार, डॉ.प्रकाश शिर्के, मंगेश कदम, भरत पवार, शेखर पवार, डॉ.राजेंद्र पवार , शिरीष मोहिते, वर्षा पवार, कल्पना पवार, विनोद पवार, निसार खान, नरेश पवार आदी मान्यवरांसह पवार कुटुंबीय उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विष्णूपंत पवार मेमोरीयल हॉस्पिटल, शृंगारतळी येथे पार पडलेल्या या शिबिरामध्ये गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, महिलांच्या मासिक पाळी संदर्भात आजारवर सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीचे स्त्री रोग तज्ञ डॉ. विनोद सांगवीकर, श्रेयस नर्सिंग होम गुहागरचे स्त्री रोग तज्ञ डॉ. सुरेश भाले, आबलोलीच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. गौरी काटदरे, अपरांत हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. भक्ती पलांडे, डेरवण हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ञडॉ. रक्षा शेट्ये, कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्री रोग तज्ञ डॉ. विन्मय जाधव, श्री हॉस्पिटल चिपळूण चे हृदयरोग व डायबिटीस तज्ञ डॉ. सत्यजित हुजरे या सर्व डॉक्टरांनी यांनी उपचार, निदान व मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व डॉक्टर्स त्याचप्रमाणे गुहागर ग्रामीण रुग्णालय, कामथे उपजिल्हा रुग्णालय, रिगल कॉलेज शृंगारतळी, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली, विष्णुपंत पवार मेमोरियल हॉस्पिटल शृंगारतळी येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

टाइम्स स्पेशल

या सर्वांचे पवार कुटुंबियांच्या वतीने सन्मान करण्यात आला.या शिबिरासाठी गुहागर मेडिकल असोसिएशन व आरोग्य विभाग गुहागर यांचे विशेष सहकार्य लाभले. गुहागर तालुक्यातील शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. उपस्थित सर्व मान्यवरांचे विष्णूपंत पवार मेमोरियल हॉस्पिटल, श्रृंगारतळी आणि पवार परिवार यांनी विशेष आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg