loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गमध्ये ’परप्रांतीय’ फेरीवाल्यांविरुद्ध एल्गार, रविवार वगळता इतर दिवशी विक्रीस मनाई

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग बाजारपेठेत रविवारचा दिवस वगळता इतर दिवशी बाहेरून येऊन व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांना विक्री करण्यास स्थानिक व्यापार्‍यांनी तीव्र विरोध करत त्यांना व्यवसाय बंद पाडण्यास भाग पाडले. स्थानिक व्यापार्‍यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही स्थानिक व्यापारी रीतसर सर्व प्रकारचे कर भरतो आणि प्रशासनाची परवानगी घेऊन व्यवसाय करतो. मात्र, हे बाहेरून येणारे परप्रांतीय फेरीवाले कुठलाही कर भरत नाहीत आणि अनधिकृतपणे व्यवसाय करून स्थानिक व्यापार्‍यांचे मोठे नुकसान करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक व्यापार्‍यांनी या बाहेरच्या विक्रेत्यांवर आणखी एक गंभीर आक्षेप घेतला आहे. अनेक परप्रांतीय विक्रेते माल वाहतुकीसाठी वापरत असलेल्या गाड्यांना नंबर प्लेट पण नसते. काही गाड्यांवर ’पाठीमागे एक आणि पुढे दुसराच’ नंबर असतो, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे कठीण होते. या वाहनांची पोलीस तपासणी होते का? असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. बाहेरच्या विक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी व त्यांना तात्काळ व्यवसाय बंद करायला लावण्यात स्थानिक व्यापार्‍यांनी पुढाकार घेतला. यावेळी स्थानिक व्यापार्‍यांनी एकत्र येत त्यांना बाजारपेठेतून हटवले: सुदेश मळीक, दिनेश केसरकर, भूषण सावंत, प्रदिप गावडे, सुधिर सावंत या व्यापार्‍यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे बाजारपेठेत नियम मोडणार्‍या बाहेरच्या विक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद करून परतावे लागले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

स्थानिक व्यापार्‍यांनी एकत्र येऊन केली कारवाई

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg