loader
Breaking News
Breaking News
Foto

केसरकर यांना साथ देऊन शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सावंतवाडी नगरपरिषदेची आगामी निवडणूक ही केवळ शिवसेनेच्या नव्हे, तर आमदार दीपक केसरकर यांच्या प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. जनतेने सर्व नगरसेवक उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला 'धनुष्य बाण' समोरील बटन दाबून नगरपरिषदेच्या सभागृहात पाठवावे आणि त्यांना जनसेवा करण्याची संधी द्यावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. ​सावंतवाडी शहरातील विविध क्षेत्रातील बुद्धीजीवी लोकांशी संवाद साधताना सामंत बोलत होते. ते म्हणाले की, कोणीतरी भावनिक आणि ऐतिहासिक आवाहन करत असले तरी, काम करण्याची ताकद कोणामध्ये आहे असा चेहरा लोकांनी निवडावा.​ प्रकृती ठीक नसतानाही आमदार केसरकर केवळ शहरासाठी मेहनत घेत आहेत.​ आपलं आयुष्य त्यांनी सावंतवाडीसाठी वेचलं आहे. त्यामुळे त्यांचे हात पुन्हा एकदा बळकट करण्याचे आवाहन सामंत यांनी केले.​ सामंत यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केसरकर यांच्यासमोर झाल्याचे सांगत, केसरकर हे सहनशीलतेचा पराकोटीचं व्यक्तीमत्व असून ते कामातून उत्तर देतात, असे गौरवोद्गार काढले.​

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माझ्या विजयातही केसरकर यांचा मोठा वाटा आहे, सिंधुरत्न योजनेचा लाभ मिळाल्यानेच मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो, असेही त्यांनी सांगितले. ​सामंत यांनी यावेळी संजू परब यांना पाडण्यासाठी घराघरात जाऊन प्रयत्न होत असल्याबद्दल भाष्य केले, मात्र कुणीही कुठे फिरले तरी संजू परब पराभूत होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही विजयी होईल. "आम्ही जनतेशी बांधील असणारी लोक आहोत. सावंतवाडीतील क्रांतिकारक बदल दीपक केसरकर यांच्यामुळे दिसतो. त्यामुळे शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांना निवडणूक देत संधी द्यावी. काम करण्याची कुवत, क्षमता कोणात आहे? याचाही विचार करावा," असे आवाहन त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

​सामंत यांनी केसरकर यांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, त्यांची तब्येत बरी नसतानाही ते प्रचारात उतरले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली पाहिजे असे सांगितले. ​सिंधुदुर्गची बेरोजगारी दूर करण्यासाठी आपला पुढाकार असणार आहे, अशी ग्वाही उद्योगमंत्री सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून महिलांसाठी ८० टक्के निधी मी देण्यास सक्षम आहे. ​सावंतवाडी शहरातील १ हजार मुलं स्वताच्या पायावर उभी राहतील यासाठी संकल्प करा. ​वेळप्रसंगी सगळं मंत्रालय सावंतवाडीत घेऊन येतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.​महिलांसाठी क्लस्टर तयार करा, पर्यटन, निवास, फूड ट्रॅक यांसारख्या क्षेत्रांसाठी ५०० मुला-मुलींनी संकल्प करावा, असे ते म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg