loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपच्या उमेदवारांनाच माझा पाठिंबा : खास. नारायण राणे

कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली नगरपंचायतचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभाशीर्वाद घेतले. यावेळी खास. नारायण राणे यांनी माझा भाजपच्या उमेदवारांनाच संपूर्ण पाठिंबा आहे इतर कोणालाही पाठिंबा नाही असे स्पष्ट केले. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ही भेट घेतली.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महिला जिल्हाध्यक्ष सौ. कोरगावकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर अनंत नलावडे यांच्यासह,नगरसेवक पदाचे उमेदवार राकेश बळीराम राणे , प्रतीक्षा प्रशांत सावंत ,स्वप्निल शशिकांत राणे, माधवी महेंद्रकुमार मुरकर , मेघा अजय गांगण, स्नेहा महेंद्र अंधारी , सुप्रिया समीर नलावडे ,गौतम शरद खुडकर , मेघा महेश सावंत, आर्या औदुंबर राणे , मयुरी महेंद्र चव्हाण,मनस्वी मिथुन ठाणेकर ,गणेश उर्फ बंडू हर्णे , सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे ,विश्वजीत विजयराव रासम, संजय मधुकर कामतेकर , अबिद नाईक आदी सतरा उमेदवार उपस्थित होते.त्याचप्रमाणे भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg