loader
Breaking News
Breaking News
Foto

सौ.शिल्पाताई सुर्वे रत्नागिरीकरांच्या पसंतीच्या उमेदवार,त्यांची बांधिलकी जनतेशी,नातेवाईकशाही नाही! : बंड्याशेठ साळवी

रत्नागिरी (प्रतिनिधी) - ‘‘रत्नागिरीत नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या सर्वमान्य उमेदवार सौ. शिल्पाताई सुर्वे या निवडणुक रिंगणात उतरल्या आहेत. सौ. शिल्पाताई सुर्वे यांची बांधिलकी थेट रत्नागिरीकरांसोबत आहे, त्या कुणाच्या नातेवाईक आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली असे नव्हे तर तमाम रत्नागिरीकरांच्या पसंतीने त्या जनतेच्या उमेदवार होत. त्यांचा विजय हा जनतेचा विजय असेल.. त्यांच्या हातात रत्नागिरी न.प.ची ‘किल्ली’ रत्नागिरीकर निश्‍चिंत मनाने सुपूर्द करतील.. सौ. शिल्पाताई सुर्वे दणदणीत मताधिक्क्याने विजयी होतील व रत्नागिरीचा विकास गतिमान होईल’’ असे रत्नागिरीचे भूतपूर्व नगराध्यक्ष श्री. प्रदीप तथा बंड्याशेठ साळवी यांनी खणखणीत प्रतिपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगर पालिका निवडणुकांच्या पूर्वसंध्येला त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी सारे काही सडेतोडपणे कथन केले. श्री. प्रदीप तथा बंड्याशेठ साळवी हे खुल्या दिलाचे व मोकळ्या स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितले, ‘‘अनेकजण आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी देतात. कुणी आपल्या पत्नीला तर कुणी घरातील अन्य कुणा नातेवाईकांना निवडणुकीला उभे करतात. तसा प्रकार सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या बाबतीत नाही. त्या कुणाच्या तरी नातेवाईक आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.. येथे ‘नातेवाईकशाही’ औषधालाही नाही’’ अशा सडेतोड शब्दात त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली.

टाइम्स स्पेशल

श्री. बंड्याशेठ साळवी सडेतोडपणे बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘सौ. शिल्पाताई सुर्वे या जनतेच्या म्हणजेच समस्त रत्नागिरीकरांच्या पसंतीच्या उमेदवार आहेत. या घडीला सौ. शिल्पाताई सुर्वे यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी अशी सार्‍या रत्नागिरीकरांची मनोधारणा होती. रत्नागिरीकरांच्या इच्छेला मान देऊन पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी मोठ्या मनाने सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या नावाला मान्यता दिली आणि आता त्या समस्त रत्नागिरीकरांच्या पसंतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत’’ असे त्यांनी नमूद केले. श्री. बंड्याशेठ साळवी परखडपणे बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘सौ. शिल्पाताई सुर्वे या अत्यंत भरवशाच्या व निश्‍चिंत रहावे अशा नगराध्यक्षा असतील. त्या सोज्वळ व सुसंस्कृत तसेच कर्तबगार व जनसेवेला सदैव तत्पर असणार्‍या नेत्या आहेत. त्यांच्या विषयी सार्‍या रत्नागिरीकरांच्या मनात फार मोठी आदराची भावना वसत आली आहे. थोडक्यात सांगायचे तर त्या ‘कर्तबगारी सिध्द’ केलेल्या नेत्या आहेत’’ असे त्यांनी परखडपणे सांगितले. श्री. बंड्याशेठ साळवी तडफेने बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘एखादा कर्तबगार व जनहित दक्ष नगराध्यक्ष जसा असायला हवा तशा सौ. शिल्पाताई सुर्वे या आहेत. त्या फाटक हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून लोकप्रिय होत्या.. तशाच त्या रत्नागिरीच्या ‘जनता प्रिय नगराध्यक्षा’ म्हणून लोकप्रिय होतील. त्यांनी दामले हायस्कूलला उच्च स्तरावर नेले व कर्तबगारी सिध्द करुन दाखवली.. तशाच त्या रत्नागिरीच्या नगराध्यक्षा म्हणून निस्पृहपणे सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करुन कर्तबगारी सिध्द करुन दाखवतील यात शंका नाही’’ अशा शब्दात त्यांनी सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या कार्याचा गौरव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg