देवरुख (सुरेश सप्रे) - देवरूख शहराच्या विकासाला गती व नवी दिशा देत पारदर्शक कारभार करून देवरूखातील सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सर्व घटकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करून शहराचा कायापालट करून दाखविणेसाठी महा आघाडीला संधी द्या असे आवाहन नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा च्या उमेदवार सबुरी तुषार थरवळ यांनी दै. रत्नागिरी टाइम्स शी बोलताना केले. महाविकास आघाडीने माझ्या सारख्या राजकीय अनुभव नसलेल्या स्त्रीवर विश्वास टाकला आहे. तो माझा मोठा सन्मान आहे याचे भान ठेवून पारदर्शक कारभार करून देवरुख शहराच्या विकासासाठी मला झोकून देत काम करण्यासाची संधी आहे. म्हणून या वेळेस राजकारण बाजूला ठेवून, व्यक्तीगत स्वार्थ विसरून, फक्त देवरुखचा विचार करून मला समाजकारण करण्यासाठी संधी मिळावी अशी अपेक्षा थरवळ यांनी व्यक्त केली. आमच्या घरात राजकारण नसून सेवाभाव आहे शिवसेना पक्षाच्या प्रत्येक मोर्चा, रॅली, सभा किंवा निषेध आंदोलनात गेल्या अनेक वर्षांपासून माझे पती( मून्ना) व कुटुंब निष्ठेने व प्रामाणिकपणे सहभागी होत आले आहे. त्यामुळेच मला महा आघाडी कडून सर्व संमतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. माझं राजकारण हे खुर्चीसाठी नाही तर देवरुखच्या सर्वांगीण विकासासाठी असेल.
गावात अनेक समस्या आहेत रस्ते, पाणी, उघडी गटारे. राजरोस बिनदिक्कतपणे उभी राहात असलेली अनधिकृत बांधकामे. शहरातील वाहतूक कोंडी आदी सर्व समस्या असोत. या प्रत्येक समस्येकडे सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात पुढाकार घेवून मार्ग काढीन. तसेचमहिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न. गावातील सांडपाणी समस्या, लहान मुलांच्या मैदानांची गरज, वृद्धांसाठी सुविधा. सार्वजनिक मुताऱ्या व शहराचे सौंदर्यीकरण ही सर्व कामे प्राधान्यक्रमाने मी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची मी खात्री देते. राजकारण न करता लोकांच्या समस्या विश्वासाने समजून घेत त्या सोडवण्यासाठी निस्वार्थीपणे प्रयत्न करताना सामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरपंचायती कारभारात स्वच्छ व पारदर्शकपणे होणेसाठी कठोर निर्णयाची अंमलबजावणी करावी लागली तरी ती करुन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचा दावा ही त्यांनी व्यक्त केला.
एक स्त्री फक्त घरच नाही तर समाजसुद्धा घडवू शकते. मी असे देवरुख शहर घडवू इच्छिते जिथे विकास, सुरक्षितता आणि शिक्षण यांना प्राधान्य असेल त्त्याचबरोबर गावामध्ये स्वयंनिर्मित रोजगाराना प्राधान्य कसे देता येईल तसच लोक हितोपयोगी उपक्रम आपल्या शहरात राबवून रोजगार निर्मिती करणेसाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले. निवडणूक म्हणजे फक्त एक मतदानाचा दिवस नाही, तो माझ्या आणि तुमच्या घरच्यांच्या, मुलांच्या भविष्यासाठी घेतलेल्या निर्णय असेल. बदल हवा असेल तर आवाज उठवावा लागतो आणि तुमचे मत हाच तुमचा आवाज आहे भ्रष्टाचार, पक्षपात न करता जनतेसाठी काम करणारी एकच सत्ता म्हणजे शिवसेना असुन नवा चेहरा, नवी दिशा, नवा विकास देण्याची. आपल्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि विश्वासाने मी देवरुख नगराध्यक्ष पदाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मला विजयी करतील असा विश्वास ही सौ. सबुरी थरवळ यांनी व्यक्त केला.




















































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.