loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात भाजपाच्या बड्या नेत्यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज, महायुतीपुढे मोठे आव्हान

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायत निवडणुकीत भाजपा शिवसेना पक्ष एकत्रीत निवडणुका लढविल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे युतीत आलबेल नसून महायुतीपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. लांजा नगरपंचायत दोन डिसेंबरला निवडणूक असल्याने सोमवारी १८नोव्हेबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस होता. भाजपा पक्षाचे माजी नगरसेवक उपजिल्हाध्यक्ष कट्टर राणे समर्थक संजय यादव यांच्या पत्नी प्रियांका संजय यादव यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते विजय कुरुप, माजी नगरसेवक, भाजप पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संजय यादव, माजी शहरध्यक्ष प्रमोद कुरुप, विशु जेधे आदी उपस्थित होते तसेच नगरसेवक पदासाठी मुग्धा मनोज चांदोरकर, ओंकार विश्वास आंब्रे, श्वेता प्रकाश तरळ, प्रमोद मनोहर कुरुप, अंजली अनिल कांबळे, किशोर तुकाराम यादव, शितल चंद्रशेखर सांवत, अवंतिका चंद्रशेखर सावंत यांनी आपले अर्ज दाखल केले. भाजपचे एकूण ९ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहरातील भाजपाच्या कार्यकर्ते यांनी महायुतीत नगराध्यक्ष पदावरही दावा करून सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अशी मागणी आठवडाभरापूर्वी केली होती अन्यथा स्वबळावर निवडणूका लढविण्याची घोषणा केली होती, मात्र भाजपाला केवळ एक जागा देण्यात आली. त्यामुळे भाजप कार्यकर्ते यांनी स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली असल्याने महायुतीपुढे पेच निर्माण झाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg