loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेच्या दोन्ही गटांना आवाहन, शिल्पाताई सुर्वेंना रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदी विजयी करा :चंदुभाई देशपांडे

पाचल (प्रतिनिधी) - ‘‘रत्नागिरी नगरी आज परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. ना. उदय सामंत यांनी मोठे परिश्रम घेऊन अनेक योजनांची आखणी केली, त्या मंजुर करुन घेतल्या आणि निधीची देखील तरतूद करुन घेतली. आता रत्नागिरी न.प. मध्ये लोक प्रतिनिधींचा कारभार सुरु झाल्यावर या सर्व योजना कार्यान्वीत होतील. एवढेच नव्हे तर ‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पाला वेग येईल.. या प्रकल्पासाठी सुरुवातीचा निधी रु. ५०० कोटींचा आहे. म्हणूनच रत्नागिरीच्या वेगवान विकासासाठी आता सर्वांनी पक्षीय व गटातटाचे राजकारण बाजूला सारुन अभ्यासू व सोज्वळ अशा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्याकडे रत्नागिरी न.प. च्या ‘किल्ल्या’ सुपूर्द कराव्यात!‘‘ असे खणखणीत प्रतिपादन चंदुभाई देशपांडे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चंदुभाई देशपांडे हे ८५ वर्षांचे ‘तरुण योध्दा’ म्हणून ओळखले जातात. ते हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रमुख होते. चंदुभाई देशपांडे यांनी सांगितले की, ‘‘रत्नागिरी शहर या घडीला विकासाच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावे लागेल. ना. उदय सामंत यांनी परिश्रम घेऊन रत्नागिरीसाठी अनेक प्रकल्प मंजुर करुन आणले आहेत. एवढेच नव्हे तर त्यासाठी निधीची देखील तरतूद करुन घेतली आहे. आता ८ दिवसात लोक प्रतिनिधींचा कारभार न. प. मध्ये सुरु होईल आणि मग विकास कामांना वेग मिळेल. अशावेळी सर्वांनी पक्षीय व गटातटाचे राजकारण बाजूला सारुन रत्नागिरीच्या विकासासाठी खुल्या दिलाने एकत्र यायला हवे’’ असे त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

चंदुभाई देशपांडे हे अविभक्त शिवसेनेचे म्हणजेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘अजिंक्य’ शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख होते. त्यांच्यावर बाळासाहेबांचा विशेष लोभ होता. त्यांनी सांगितले, ‘‘कधी नव्हे ती संधी यावेळी चालून आली आहे. रत्नागिरी नगरीचा वेगवान विकास साधायचा असेल तर पक्षांचे व गटातटांचे राजकारण पूर्णत: बाजूला ठेवावे लागेल’’ असे त्यांनी स्पष्ट केले. चंदुभाई देशपांडे यांनी पुढे सांगितले, ‘‘आजवर ही परशुराम भूमी पक्षीय व गटातटांच्या राजकारणात अडकून पडल्याने विकासापासून दूर राहिली. म्हणूनच शिवसेनेच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी ‘विकास‘ या एकाच मुद्यावर एकदिलाने व एकमताने ‘सक्षम’ व ‘सुयोग्य’ उमेदवारांना निवडून द्यावे. तरच या रत्नागिरी नगरीला ‘बरकत’ येईल व रत्नागिरी वासियांना उत्तम सुविधांचा लाभ घेता येईल’’ असे सडेतोड शब्दात त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg